रोजगार मिळत नसल्याने तरुणांची परवड
नाशिक : अनलॉकनंतर जनजीवन पूर्वपदावर येत असले तरी रोजगाराच्या पुरेशा संधी नसल्याने तरुणांची परवड होत आहे. मागील वर्षीपेक्षा यंदा व्यापाऱ्यांना बंदचा फारसा सामना करावा लागला नाही. काही प्रमाणात व्यवहार सुरळीत सुरू असतानाही रोजगाराच्या बाबतीत कामगारांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे तरुणांना भाजीपाला तसेच अन्य व्यवसायाकडे वळावे लागत आहे.
रुग्णसंख्या वाढत असल्याने चिंता
नाशिक: गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांचे प्रमाण आवाक्यात असल्याने निश्चिंत झालेल्या नाशिककरांची पुन्हा चिंता वाढली आहे. शहरातील रुग्णांची संख्या वाढल्यामुळे कोराेना पुन्हा एकदा डोके वर काढत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी पुन्हा एकदा दक्षता घेण्यास सुरुवात केली आहे.
सातपूर येथील केंद्रावर गर्दी
नाशिक : सातपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर लसीकरणासाठी मोठी रांग लागत आहे. अठरा वर्षांवरील व्यक्तींचे लसीकरण करण्यास प्रारंभ झाल्यानंतर शहरातील लसीकरण केंद्रांवरील गर्दी वाढत आहे. त्यामध्ये सातपूर येथील प्रतिसाद चांगला असल्याचे दिसून येते. लसीकरणासाठी केंद्राच्या परिसरात लांबच लांब रांग लागत आहे.