पिंपळगाव बसवंत : चुकीच्या धोरणांमुळे यंदा ४० टक्केच पाणीपुरवठा शिल्लक असल्याने द्राक्ष बागाईतदार संकटात सापडले आहे. त्यासाठी निफाड तालुक्यातील कारसूळ, नारायण टेंभी व वडाळी नजीक येथील शेतकऱ्यांनी द्राक्षपीक धोक्यात आल्याने कादवा नदीत सिंचनासाठी पाणी सोडावे अन्यथा उपोषण व येणाºया लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यात येईल, असे निवेदन दि. २४ रोजी पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांना देण्यात आले होते. प्रशासनाने त्यांची दखल न घेतल्याने येथील शेतकºयांनी कारसूळ येथील राम मंदिरासमोर गांधी पर्याय अवलंबून बुधवारपासून (दि. २६) बेमुदत उपोषणास प्रारंभ होणारआहे.निफाड तालुक्यातील रौळस केटीवेअर बंधाºयात पाणीच नसल्याने परिसरातील ६०० ते ७०० हेक्टरवरील द्राक्षबागा संकटात सापडल्या आहेत. प्रशासनाने याची दखल घेऊन सिंचनासाठी त्वरित पाणी सोडावे, अशी मागणी पालकमंत्री व जिल्हाधिकारी कार्यालयात दि. २४ रोजी येथील शेतकºयांनी केली होती.परंतु अद्यापही प्रशासनाने कोणतीच भूमिका न घेतल्याने येथील शेतकºयांनी बेमुदत अमर उपोषणास सुरु वात केली.निफाड तालुक्यातील कारसूळ या गावाजवळून कादवा नदीपात्र असून, यावर रौळस, पिंपरी गावाजवळ कोल्हापूर टाइप बंधारा आहे. हा बंधारा भरण्यासाठी पाटबंधारे खात्याच्या नियमानुसार प्लेट्स टाकाव्या लागतात, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे; परंतु याच काळात पावसाळा विश्रांती घेतो. परिणामी चुकीच्या धोरणामुळे केवळ ४० टक्के साठा शिल्लक असतो. त्यामुळे परिसरातील द्राक्ष पिके संकटात सापडतात.आजच्या स्थितीला या गावातील यावेळी देवेंद्र काजळे, भाऊसाहेब शंकपाळ, ओमप्रकाश ताकाटे, प्रवीण वाघ, नितीन गवळी, जीवन वाघचौरे, विठ्ठल गाडे, अजय गवळी, बाळासाहेब गवळी, श्यामराव जाधव, शशिकांत गवळी, विजय काजळे, योगेश ताकाटे, वाल्मीक घोलप, दौलत गोडसे, नीलेश कदम, भूषण पगार आदींसह शेतकरी सध्या गावातील काळाराम मंदिर परिसरात बेमुदत उपोषणाला बसले आहेत.
पाण्याअभावी द्राक्षबागा संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 6:27 PM
चुकीच्या धोरणांमुळे यंदा ४० टक्केच पाणीपुरवठा शिल्लक असल्याने द्राक्ष बागाईतदार संकटात सापडले आहे. त्यासाठी निफाड तालुक्यातील कारसूळ, नारायण टेंभी व वडाळी नजीक येथील शेतकऱ्यांनी द्राक्षपीक धोक्यात आल्याने कादवा नदीत सिंचनासाठी पाणी सोडावे अन्यथा उपोषण व येणाºया लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यात येईल, असे निवेदन दि. २४ रोजी पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांना देण्यात आले होते. प्रशासनाने त्यांची दखल न घेतल्याने येथील शेतकºयांनी कारसूळ येथील राम मंदिरासमोर गांधी पर्याय अवलंबून बुधवारपासून (दि. २६) बेमुदत उपोषणास प्रारंभ होणारआहे.
ठळक मुद्देनिवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय