नाशिक शहर काँग्रेसची बैठक शनिवारी (दि. २६) काँग्रेस भवन येथे घेण्यात आली. या बैठकीस प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस योगेंद्र पाटील, आमदार सुधीर तांबे, आमदार हिरामण खोसकर, प्रदेश प्रवक्त्या डॉ. हेमलता पाटील, गटनेते शाहू खैरे, महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा वत्सला खैरे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित हेाते.
शहराध्यक्ष शरद आहेर यांनी गेल्या निवडणुकीतील पराभवाचे विश्लेषण करताना राष्ट्रवादीवर टीका केली. आघाडी धर्म पाळत असताना सहयोगी पक्षाने अनेक ठिकाणी काँग्रेसच्या विरोधात उमेदवार दिले. तसेच काही उमेदवार पळण्याचे काम केल्याने पक्षाचे नुकसान झाल्याची टीका त्यांनी केली. तर आमदार सुधीर तांबे आणि हिरामण खोसकर यांनी पक्षाचे काम निरंतर करून जनसामान्यांची समस्या सोडवल्यास यश हमखास मिळते असे सांगितले. तर योगेंद्र पाटील यांनी पक्षाची ध्येयधेारणे मांडली. यावेळी वत्सला खैरे व राहुल दिवे यांनी महिला तसेच युवकांना जास्तीत जास्त उमेदवारी देण्याची मागणी केली.
यावेळी माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, शाहू खैरे, राजेंद्र बागुल बबलू खैरे, सुरेश मारू यांनीदेखील मनोगत व्यक्त करताना पक्ष संघटन मजबूत करण्याची सूचना केली. बैठकीस माजी नगरसेवक सिराज कोकणी, लक्ष्मण जायभावे, गुलजार कोकणी, वसंतराव माेराडे, नगरसेविका आशा तडवी, सेवा दलाचे वसंत ठाकूर, युवक काँग्रेसचे अध्यक्ष स्वप्निल पाटील तसेच उध्दव पवार यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
इन्फो...
पक्षातील काही नेते पक्षाचीच हानी करीत असल्याचे कडवे बोल डॉ. हेमलता पाटील यांनी ऐकवले. तसेच महापालिकेतील टक्केवारीसह अनेक विषयांवर टीका करतानाच आगामी काळात तरी सुधारणा करण्याची सूचना केली.
..
छायाचित्र २६ पीएचडीसी ६४ - शहर काँग्रेसच्या बैठकीत बेालताना आमदार सुधीर तांबे समवेत व्यासपीठावर आशा तडवी, राहुल दिवे, राजेंद्र बागुल, शरद आहेर, आमदार हिरामण खोसकर, बबलू खैरे, डॉ. शोभा बच्छाव, डॉ. हेमलता पाटील, वत्सला खैरे, वसंत ठाकूर.