शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या क्षणी काँग्रेसचा 'यू-टर्न'; उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराऐवजी अपक्षांना जाहीर पाठिंबा
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : निवडणुकीदिवशीच सोलापुरात ठाकरे गटाला धक्का! सुशीलकुमार शिंदेंचा अपक्ष उमेदवाराला पाठिंबा
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात सहकुटुंब बजावला मतदानाचा अधिकार
4
Vidhan Sabha 2024: महिला उमेदवारांचे त्रिशतक; आतापर्यंतचा उच्चांक!  
5
RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल; रिझर्व्ह बँकेनं नागरिकांना केलं सावध, म्हणाले...
6
शिंदेंच्या शिवसेनेकडून बनावट पत्र, राज ठाकरे संतापले; "वरळीकर मतदार सूज्ञ..." 
7
चंदा कोचर यांच्याविरोधात कारवाई करू नका, उच्च न्यायालयाचे एसएफआयओला निर्देश 
8
Sharad Pawar: सुप्रिया सुळेंवर मतदानाच्या आदल्या दिवशी गंभीर आरोप; शरद पवारांनी एका वाक्यात विषय संपवला!
9
विधानसभा निवडणुकीत 'आप' कोणाला तिकीट देणार? अरविंद केजरीवालांकडून मोठा खुलासा
10
सदा सरवणकरांच्या कोटवर दिसला उलटा 'धनुष्यबाण'; मनसेच्या अमित ठाकरेंनी केला सरळ
11
Jio New Recharge: केवळ इतक्या रुपयांमध्ये मिळणार वर्षभरासाठी अनलिमिटेड 5G डेटा; पाहा डिटेल्स
12
"गुंडगिरी खपवून घेणार नाही, २ तासांचा वेळ, नाहीतर..."; केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल संतापल्या
13
कंगना रणौतने चक्क आर्यन खानचं केलं कौतुक; म्हणाली, "फिल्मी कुटुंबातून येऊनही..."
14
Parali Vidhan Sabha Election 2024: परळीत गैरप्रकार, कॅमेरे बंद ठेवले; महिलांनी भितीच्या वातावरणात केले मतदान
15
२१३ कोटींच्या दंडाला  ‘मेटा’ देणार आव्हान; स्पर्धाविरोधी कृत्याबाबत आयोगाचा ठपका
16
Pune Vidhan Sabha Election 2024 : जिल्ह्यात पहिल्या दोन तासात ५.५३ टक्के मतदान, सर्वाधिक ७.४४ टक्के मतदानाची कसब्यात नोंद
17
पनवेल रुग्णालयात नवजात बालकाचा मृत्यू; आरोग्य व्यवस्थेच्या निष्क्रियतेचा आणखी एक बळी
18
IND vs SA 4th T20: भारताचा राग अंपायरवर काढायला गेला, ICC चांगलाच दणका दिला!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
20
"प्रत्येकीला ३००० द्यायचेत ना?" विनोद तावडे प्रकरणावरुन आस्ताद काळेची टिप्पणी

नांदूरशिंगोटे येथे म्हाळोबा यात्रेत कोट्यवधींची उलाढाल

By admin | Published: February 23, 2016 11:06 PM

दोडी : राज्यभरातील भाविकांची हजेरी

नांदूरशिंगोेटे : राज्यभरातील धनगर समाजाचे आराध्यदैवत म्हाळोबा महाराजांच्या तीन दिवसीय यात्रोत्सवाची उत्साहात सांगता झाली. मंगळवारी दिवसभरात सुमारे ८० हजारांहून अधिक भाविकांनी दर्शन घेतले. यावेळी सुमारे पंधराशे बोकडबळी देऊन नवसपूर्ती करण्यात आली. यात्रेनिमित्त विविध व्यवसायातून कोट्यवधी रुपयांची आर्थिक उलाढाल झाल्याचा अंदाज आहे.परिसरातील जागृत देवस्थान समजल्या जाणाऱ्या म्हाळोबा यात्रेचा मंगळवारी शेवटचा दिवस होता. त्यामुळे राज्याच्या विविध भागातून दोडी येथे आलेल्या भाविकांनी सकाळपासूनच दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. दर्शन आणि बोकडबळीनंतर भाविकांनी यात्रेत थाटलेल्या विविध दुकानांमध्ये खरेदीचा आनंद लुटला. नोकरी - व्यवसायानिमित्त बाहेरगावी असलेले नागरिक व माहेरवाशिणीही यात्रेसाठी गावात येत असल्याने एकमेकांशी गाठीभेटी होऊन यात्रेला स्रेहसंमेलनाचे स्वरुप आल्याचे दिसून आले. दुपारी कुस्त्यांची विराट दंगल झाली. त्यात १०० रुपयांपासून पंधराशे रुपयांपर्यंत विजेत्या मल्लांना बक्षिसे देण्यात आली. येथे अनेक वर्षांची जाब लावण्याची प्रथा आजही टिकून आहे. रविवार, गुरुवार, पौर्णिमा, अमावास्येला परिसरातील भाविकांची गर्दी असते. भाविक जाब लावून नवस बोलतात व यात्रा काळात नवसपूर्ती केली जाते. त्यामुळे नवसपूर्तीसाठी मोठी गर्दी उसळली होती. यात्रेच्या पहिल्या दिवशी गावातील कावडीधारकांनी आणलेल्या गंगाजलाची, देवाच्या मुखवट्याची व देवकाठ्यांची गावातून डफाच्या तालावर सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर मूर्तीवर गंगाजलाचा अभिषेक घालण्यात आला. दुपारी होम-हवन, पूजा, आरती व नैवद्य दाखविण्यात आले़