संगमेश्वर : अतिवृष्टीने मालेगाव तालुक्यात पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. चंदनपुरी येथे नुकसान झालेल्या पिकांचे पीक पंचनामे करण्यास शासनाने सुरुवात केली आहे.
गत १५ दिवसांपासून संपूर्ण राज्यात अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे राज्यात सर्वत्र पिकांचे नुकसान झाले आहे. मालेगाव परिसरात मका, बाजरी, कांदा व सोयाबीन या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अशा परिस्थितीत कृषी सहायक रोहित बच्छाव व तलाठी राहुल बिडगर यांनी चंदनपुरीच्या शेती शिवाराची फेरी करून पिकांची पाहणी करून पंचनामे केले. यावेळी अशोक सावकार, शिवाजी पुरकर, प्रकाश सावकार, निंबा मांडवडे, महेंद्र महाजन यांच्यासह शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.