ठळक मुद्देशेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी चिंचावड येथील शेतकºयांनी केली आहे.
पाटणे: मालेगांव तालुक्यातील चिंचावड येथे वादळी वाऱ्यासह झालेल्या अतिवृष्टीमुळे सर्वच पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे .वादळी वाºयामुळे शेवगा,डाळिंब कोबी,कांदा, कांदा रोप,मका यांचे शंभर टक्के नुकसान झाले आहे . तसेच वादळामुळे किरकोळ प्रमाणात शिल्लक कांदा वादळी पावसामुळे भिजला आहे. कालच्या अस्मानी संकटा मु शेतकरी पुरता हवालदिल झाला असून शासनाने तातडीने दखल घ्यावी पंचनामा करून शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी चिंचावड येथील शेतकºयांनी केली आहे.चिंचावड येथे पिकांचे झालेले नुकसान तर दुसºया छायाचित्रात भुईसपाट झालेला कांदा. (२० मालेगाव १/२)