पावसाच्या आगमनामुळे पेरणीची तयारी सुरु झाली असून नांदगाव तालुक्यात एकूण खरीप पेरणीच्या ४२ टक्के मका या पिकाची लागवड होते. शेतकरी तयारीला लागला आहे. एकूण ८४ प्रकारच्या पिकांना लष्करी अळीचा धोका संभवतो. आपल्या भागात मका, उस, ज्वारी ही पीके लष्करी अळीच्या आक्र मणाला बळी पडू शकतात. रात्रीत १०० किमी अंतर कापणारी ही अळी आहे. ती ओळखण्याची मुख्य खूण म्हणजे अळीच्या डोक्याच्या पुढच्या बाजूस उलट इंग्रजी वाय आकाराची खूण असते. यासाठी एकात्मिक व्यवस्थापन सुचवण्यात आले असून खोल नांगरणी, किडीचे पतंग आकर्षित करण्यासाठी प्रकाश सापळे व कामगंध सापळ्याचा वापर करणे, अळीचा नायनाट करण्याच्या उपायांच्या अधिक माहितीसाठी तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी कृषी विभागामार्फत आउट आॅफ क्लासरूमचे आयोजन करण्यात आले आहे.
पिकांना लष्करी अळीचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 5:59 PM