नाशिक : महापालिका हद्दीत शिकणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांसाठी सुवर्णमहोत्सव योजनेंतर्गत शासनाच्या आदिवासी विकास विभागाने एक कोटी रुपयांहून अधिक निधी पालिकेला सुपूर्द केला आहे. हा निधी वर्षभरापासून प्रलंबित होता. त्यानुसार दोन टप्प्यात हा निधी आला. पहिल्या टप्प्यात ६ हजार ५७८ विद्यार्थांसाठी ३० लाख ७१ हजार ६०० रुपये, त्यानंतर ६४० विद्यार्थ्यांसाठी ६ लाख १९ हजार ९५० रुपये, तसेच ४ हजार ६६३ मुलांसाठी ५३ लाख ४० हजार रुपये याप्रमाणे निधी मिळाला. दुसऱ्या टप्प्यात ३५ लाख ३७ हजार, त्यानंतर ३१ लाख ३० हजार, तसेच २७ लाख ३४ हजार रुपये याप्रमाणे निधी मिळाल्याची माहिती प्रशासनाधिकारी किरण कुंवर यांनी दिली. (प्रतिनिधी)
आदिवासी विभागाकडून कोट्यवधीचा निधी
By admin | Published: August 19, 2014 12:37 AM