नाशिक : पेठ तालुक्यात बेकायदेशीरपणे मोठ्या प्रमाणावर खाणीतून दगडाचा उपसा करून अनधिकृत क्रशरद्वारे कोट्यवधी रुपये किमतीच्या गौणखनिजाची चोरी केल्याच्या तक्रारीत प्रथमदर्शनी तथ्य आढळून आले असून, यासंदर्भात जिल्हा गौणखनिज अधिकाºयांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देत पाहणी करून याबाबतची कागदपत्रे संबंधितांकडून मागविली आहेत.तीन महिन्यांपूर्वी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या एका सदस्याने जिल्हाधिकाºयांकडे यासंदर्भात तक्रार केली होती. पेठ शहर व लगतच्या खोकडतळे येथे गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेचे पदाधिकारी भास्कर गावित यांच्याकडून बेकायदेशीरपणे गौणखनिजाचा उपसा केला जात असून, त्यासाठी कोणतीही परवानगी घेण्यात आली नसल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते.या तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकाºयांनी तहसीलदारांकडून माहिती मागविली असता, त्यात मोघम स्वरूपाची चौकशी करण्यात आली. अखेर जिल्हा गौणखनिज अधिकाºयांकडून या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली. गेल्या आठवड्यात गौणखनिज अधिकारी प्रशांत कोरे यांनी पेठ येथे भेट देऊन पाहणी केली. पेठ शहराला लागून व पेठपासून तीन किलोमीटर अंतरावर अशा दोन ठिकाणी दगडाच्या असलेल्या टेकड्यांमधून मोठ्या प्रमाणावर दगडाचा उपसा करण्यात येऊन जवळच खडी क्रशर चालविले जात असल्याचे त्यांना आढळून आले. प्रथमदर्शनी या खाणींसाठी कोणतीच अनुमती घेण्यात आलेली नसल्याचे दिसून आले. या टेकड्यांमधून गेल्या अनेक वर्षांपासून उपसा केला जात असल्याचे दिसत असल्याने त्याचे पंचासमक्ष मोजमापही करण्यात आले.या मोजमापाच्या आधारे खाणीतून नेमके किती गौणखनिजाचे उत्खनन केले ते उघड होणार आहे. सदरच्या खाणीतून शिवसेनेचे पदाधिकारी भास्कर गावित यांनी उत्खनन केले असून, त्यातील एक गटाचे ते स्वत: मालक आहेत तर दुसरा गट दुसºया व्यक्तीच्या नावावर आहे. उत्खननासाठी लागणारी एनएची परवानगीही घेतली गेली नसल्याचे प्रशासनाच्या अधिकाºयांचे म्हणणे आहे. अधिकाºयांसमक्ष तक्रारदाराला धमकीजिल्हा गौणखनिज अधिकाºयांनी पेठ तहसील कार्यालयाला भेट देऊन माहिती जाणून घेतली. तसेच तक्रारदार व साक्षीदारांचे जबाब नोंदवून घेत असताना भास्कर गावित व त्यांच्या सहकाºयांनी शिवीगाळ व धमकी दिल्याची तक्रार या प्रकरणातील साक्षीदार सुनील मालुसरे यांनी केली आहे. अधिकाºयांच्या समक्ष हा प्रकार घडल्याने गौणखनिज माफियांची भीड चेपली गेल्याचे मालुसरे यांनी म्हटले असून, यासंदर्भात जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पोलीस प्रमुखांकडे तक्रार करण्यात आली आहे.
कोट्यवधीच्या महसुलावर पाणीबेकायदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2017 11:38 PM