झोडगे : येथे युरिया खत मिळवण्यासाठी सकाळी शेतकऱ्यांनी खते एजन्सी दुकानावर प्रचंड गर्दी केली मात्र युरिया खत मिळत नसल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडत आहे.पिकांची वाढ जोमाने व्हावी यासाठी युरिया खत अत्यावश्यक असल्याने ते मिळविण्यासाठी शेतकरी युरिया मिळतो याची माहिती झाल्यावर लांब लांब जाऊन खताच्या प्रतीक्षेत दिवसभर थांबून निराशेने परत येताना दिसून येत आहे. अशा परिस्थितीत त्यांनी येथील खत दुकानावर प्रचंड गर्दी केली होती. राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी याकामी लक्ष घालून शेतकºयांची समस्या तातडीने सोडवावी, अशी मागणी शेतकºयांची आहे. तसेच मागणीपेक्षा जास्त प्रचंड प्रमाणात खते उपलब्ध असूनही त्याचा तुटवडा का निर्माण होतो याचा शोध घेऊन युरियाचा काळाबाजार करणाºयांवर योग्य ती कारवाई केली जावी, अशी मागणी तालुक्यातील शेतकºयांनी केली आहे.खते मिळवण्याच्या नादात झालेल्या गर्दीत कोरोना संसर्गाचा विसर शेतकºयांना पडलेला दिसून आला. एका बाजुला पिकांच्या आरोग्यासाठी खते मिळवण्याची धडपड करत असताना दुसरीकडे स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे याकडे कोणाचेच लक्ष नसल्याचे दिसत होते.
झोडगेत युरिया खरेदीसाठी गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2020 9:03 PM