नायगाव : सिन्नर तालुक्यातील जोगलटेंभी येथील गोदावरी-दारणेच्या संगमावर महाशिवरात्रीनिमित्त हजारो भाविकांनी स्नान करून महादेवाच्या दर्शनासाठी गर्दी केली होती.संगमावर असलेले पुरातन हेमाडपंती महादेव मंदिर प्रसिद्ध आहे. गोदा संगमावर स्नानासाठी परिसरासह जिल्हाभरातील हजारो भक्तांनी गर्दी केली होती. दुपारनंतर भाविकांचे जत्थे संगमावर येत होते. ‘बम बम भोले, ओम नम: शिवाय’च्या गजराने गोदाकाठ दणाणून गेला होता.महादेवाच्या पिंडीवर पंचामृत व गोदा-दारणेच्या पवित्र जलाने सरपंच शशिकांत पाटील व वैशाली पाटील यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला. ग्रामस्थांच्या वतीने संगमेश्वर ट्रस्टचे अध्यक्ष संतू पाटील, उपसरपंच सुरेखा पिंपळे, विलास गाडेकर, विलास जेजूरकर, लक्ष्मण भास्कर, दत्तात्रय तांबे, प्रभाकर जेजूरकर, महंत मोहनदास आदींच्या हस्ते बेलफुलांनी पूजा करण्यात आली. संदीप कमोद यांनी आलेल्या भाविकांना खिचडीचे वाटप केले.दुपारनंतर संगमाकडे येणारे सर्वच रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलून गेले होते. संजय बर्डे, विष्णू तांबे, संजय जाधव, कचेश्वर जेजूरकर, सतीश ताठे, सुदाम कमोद आदींनी दर्शनरांग, संगमावरील स्नान तसेच वाहनांची पार्किंगची व्यवस्था केली. मराठा विद्या प्रसारकच्या वतीने येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. एमआयडीसी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.चौकट - महाशिवरात्रीनिमित्त परमेश्वर उगलमुगले यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. बेलफूल व गोदा-दारणाच्या जलाने अभिषेक व दर्शनासाठी भाविकांची गर्दी केली होती. संगमाचा तट ‘बम बम भोले, ओम नम: शिवाय’च्या गजराने दणाणून गेला होता.फोटो क्र.- 04२्रल्लस्रँ05फोटो ओळी - जोगलटेंभी येथील गोदा-दारणा संगमावरील संगमेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांनी लावलेल्या रांगा.
गोदा-दारणा संगमावर दर्शनासाठी भाविकांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2019 5:22 PM
नायगाव : सिन्नर तालुक्यातील जोगलटेंभी येथील गोदावरी-दारणेच्या संगमावर महाशिवरात्रीनिमित्त हजारो भाविकांनी स्नान करून महादेवाच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. संगमावर असलेले पुरातन हेमाडपंती महादेव मंदिर प्रसिद्ध आहे. गोदा संगमावर स्नानासाठी परिसरासह जिल्हाभरातील हजारो भक्तांनी गर्दी केली होती. दुपारनंतर भाविकांचे जत्थे संगमावर येत होते. ‘बम बम भोले, ओम नम: शिवाय’च्या गजराने गोदाकाठ दणाणून गेला होता.
ठळक मुद्दे नायगाव : सिन्नर तालुक्यातील जोगलटेंभी येथील गोदावरी-दारणेच्या संगमावर महाशिवरात्रीनिमित्त हजारो भाविकांनी स्नान करून महादेवाच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. संगमावर असलेले पुरातन हेमाडपंती महादेव मंदिर प्रसिद्ध आहे. गोदा संगमावर स्नानासाठी परिसरासह जिल्