नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील दोडी बुद्रुक परिसरातील जागृत देवस्थान व धनगर समाजाचे आराध्य दैवत असलेल्या म्हाळोबा महाराज यात्रेत शेवटच्या दिवशी दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी झाली होती.मंगळवारी दीड हजारांहून अधिक बोकडबळी देत भाविकांनी नवसपूर्ती केली. तीन दिवसांपासून सुरु झालेल्या म्हाळोबा महाराज यात्रेत राज्यभरातून आलेल्या लाखो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्र म आयोजित करण्यात आले होते.दरवर्षी माघ पोर्णिमेला म्हाळोबा महाराज यात्राउत्सव असतो. नवसाला पावणारा म्हाळोबा महाराज यात्रेत भाविक नवसपूर्ती म्हणून बोकडबळी देण्याची परंपरा आहे. रविवारी (दि.१७) पासून यात्रेस सुरु वात झाली आहे. पहिल्या दिवशी म्हाळोबा महाराज यांची विधीवत महापुजा संपन्न झाली. मुखवटा, पादुका व काठ्यांची डफाच्या तालावर गावातून मिरवणूक काढण्यात आली होती. दुपारी मंदिरात मुखवट्याची स्थापना करण्यात आली होती.सायंकाळी स्थानिक भाविकांकडून मानाचे बोकडबळी देण्यात आले. दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी राज्याच्या कानाकोपर्यातून धनगर समाजाचे भाविक दाखल झाले होते. दिवसभर मंदिरात विविध प्रकारचे धार्मिक कार्यक्र म संपन्न झाले. नवसपूर्ती म्हणून बोकडबळी दिले जात होते. सांयकाळी पाऊल टेकडी येथे बाहेरून आलेल्या काठ्यांची भेट घडविण्यात आली. रात्रभर भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली होती.मंंगळवारी (दि.१९) रोजी स्थानिक भाविकांबरोबरच नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील भाविकांंनी दर्शनासाठी हजेरी लावली. सोमवारच्या तुलनेत मंगळवारी बोकडबळी व भाविकांची गर्दी अधिक होती. दिवसभरात सुमारे ५० ते ६० हजार भाविकांनी हजेरी लावली तर पंधराशेहून अधिक बोकडबळी नवसपूर्तीसाठी देण्यात आले.यात्रेचा शेवटचा दिवशी दुपारी कुस्त्यांची भव्य दंगल झाली. यात नामवंत पहिलवान सहभागी झाले होते. १०१ रूपयांपासून ११००० रूपयापर्यंत विजेत्यांना रोख बक्षिसे देण्यात आलीचौकट ...अनिसकडून भाविकांचे प्रबोधनमहाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने येथील म्हाळोबा महाराज यात्रेत सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत नवसापोटी उघड्यावर होणारी पशुहत्या या अनिष्ठ प्रथेविरोधात भाविकांचे प्रबोधन करण्यात आले. समितीच्या प्रबोधनामुळे दर वर्षीपेक्षा यावर्षी नवसापोटी पशू बळी देण्याच्या प्रमाणात मोठी घट झाल्याचे दिसून आले. या प्रबोधन कार्यक्र मात समितीचे राज्य सरचिटणीस डॉ. ठकसेन गोराणे, सदस्य राजेंद्र फेगडे, नाशिक शहर कार्याध्यक्ष प्रल्हाद मिस्त्री, रामदास राहटळ, अभय गोराणे, राहुल शिंदे, बंटी गोराणे, निवृत्ती गोराणे, शरद गोराणे, प्रमिला गोराणे, राहुल उगले आदींनी सहभाग घेतला.
म्हाळोबा महाराज यात्रेत भाविकांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 7:15 PM
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील दोडी बुद्रुक परिसरातील जागृत देवस्थान व धनगर समाजाचे आराध्य दैवत असलेल्या म्हाळोबा महाराज यात्रेत शेवटच्या दिवशी दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी झाली होती.
ठळक मुद्देनांदूरशिंगोटे : अंनिसकडून भाविकांचे बोकडबळी संबंधी प्रबोधन