नाशिक : गणेशोत्सवाचे शेवटचे तीन दिवस शिल्लक राहिल्याने शहरातील गणेश मंडळांनी साकारलेले सामाजिक आणि सांस्कृतिक देखावे पाहण्यासाठी गुरुवारी (दि.२०) गणेशभक्तांची गर्दी उसळली. गेल्या दोन दिवसांपासून शहरात परतीच्या पावसाचे आगमन झाले असून, दुपारपासूनच पावसाच्या धारा कोसळत असल्यामुळे गणेशभक्तांना देखावे पाहण्यासाठी घराबाहेर निघता आले नव्हते. परंतु, पावसाने गुरुवारी उघडीप दिल्याने आणि शासकीय कार्यालये व शाळांना मुहर्रमनिमित्त सुट्टी असल्याने शहरात गणेशभक्तांनी दर्शनासाठी अलोट गर्दी केल्याचे दिसून आले. शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सामाजिक आणि धार्मिक विषयांसह काही राजकीय देखावे साकारले आहेत. रविवार कांरजा मित्रमंडळाने अष्टविनायक दर्शनाचा देखावा साकारला असून, सराफ बाजारात सुवर्णकार गणेशमूर्ती स्थापन केला असून, येथे विठ्ठल दर्शनाचा देखावा साकारण्यात आला आहे. मालेगाव स्टॅँडवर वारकरी देखावा साकारण्यात आला असून, कैलास मित्रमंडळाने जिवंत देखावा साकरला असून, पंचवटी कारंजा येथील कंस वधाचा देखावा, मेनरोडला चित्रपट व लोकगीतांवर झळकणारी लायटिंग, शालिमार येथील जय बजरंग मित्रमंडळाचा झाडूपालून बनवलेला गणपती, गवतापासून बनविलेला गणपती पाहण्यासाठीही गणेशभक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे दिसून आले. शहरातील रविवार कारंजा, पंचवटी कारंजा, शालिमार, मेनरोड, मुंबई नाका, जुने नाशिक, पंचवटी या भागांसह बी. डी. भालेकर मैदानावरील पारंपरिक गणेश मंडळांनी साकारलेले देखावे पाहण्यासाठी दरवर्षी भक्तगण मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. परंतु, यंदाच्या गणेशोत्सवात मात्र देखावे पाहण्यासाठी भक्तांची गर्दी हवी तशी दिसत नसल्याचे बुधवारपर्यंत दिसून येत होते. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांनाही ही रुखरुख होती. मात्र, गुरुवारी पावसाने उघडीप दिल्याने आणि त्यातच शासकीय सुटीचा योगही जुळून आल्याने भाविकांनी मोठ्या प्रमाणात गणपती दर्शन व देखावे पाहण्यासाठी गर्दी केल्याचे दिसून आले. दोन दिवसांपासून शहरात दुपारनंतर पडणाऱ्या पावसामुळे भक्तांचा हिरमोड होत होता. रविवारी सुटी असूनही अनेकांच्या घरी महालक्ष्मी असल्याने भक्तांना देखावे पाहण्यासाठी जाता आले नाही. त्यामुळे इतर दिवशी सवडीप्रमाणे देखावे पाहण्यासाठी जाण्याचे नियोजन अनेकांनी केले होते. परंतु दोन दिवसांच्या पावसाने त्यावर विरजन घातले. अखेर गुरुवारी पावसाने दिलेली उघडीप आणि शासकीय सुटीचा योग जुळून आल्याने गणेशभक्तांच्या उत्साहाला उधान आल्याचे दिसून आले.काँग्रेस कमिटी टिकात्मक देखावानाशिक शहरात विविध गणेशोत्सव मंडळांना समाजिक व सांस्कृतिक देखावे उभारले असून काँग्रेस कमिटीमध्ये स्थापन करण्यात आलेल्या गणपतीचा देखावाही राजकीय स्वरूपाचा आहे. या देखाव्यातून विमानाने फिरणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखवतानाच पेट्रोल डिझेलची दरवाट, नोटबंदी, महागाई आणि भ्रष्टाचाºया आगीत होरपाळणारा जनता दाखविण्यात आली आहे. गणेशोत्सवाला यात्रचे स्वरूप सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे देखावे पाहायला येणाºया गणेशभक्तांच्या गर्दीमुळे शहराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. हीच संधी साधत ठिकठिकाणी खाद्य पदार्थांची विक्र ी करणारे स्टॉल्स, फुगे, खेळणी विक्रे ते यांच्यासह विविध प्रकारच्या वस्तू विक्रेत्यांनी मोठ्या दुकाने लावली आहे. शहरातील मुंबई नाका, निमाणी, सिडकोतील राजीवनगर मैदान परिसरातील गणेशोत्सव मंडळांचे देखावे पाहण्यासाठी येणाºया भक्तांना रहाट पाळणे, गोलाकार फिरणाºया गाड्या, झोके, एअर बाउंसी आदी खेळण्यांही उपलब्ध असल्याने गणेशोत्वला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
गणेशदर्शनासाठी भक्तांची अलोट गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 1:18 AM
नाशिक : गणेशोत्सवाचे शेवटचे तीन दिवस शिल्लक राहिल्याने शहरातील गणेश मंडळांनी साकारलेले सामाजिक आणि सांस्कृतिक देखावे पाहण्यासाठी गुरुवारी (दि.२०) गणेशभक्तांची गर्दी उसळली. गेल्या दोन दिवसांपासून शहरात परतीच्या पावसाचे आगमन झाले असून, दुपारपासूनच पावसाच्या धारा कोसळत असल्यामुळे गणेशभक्तांना देखावे पाहण्यासाठी घराबाहेर निघता आले नव्हते. परंतु, पावसाने गुरुवारी उघडीप दिल्याने आणि शासकीय ...
ठळक मुद्देउत्सवाला यात्रेचे स्वरूप : सामाजिक, सांस्कृ तिक देखाव्यांना नाशिककरांची पसंती