नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य येथे सालाबादप्रमाणे यंदाही चैत्रपौर्णिमेनिमित्त भैरवनाथ महाराजांचायात्रोत्सव व हनुमान जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त देवीच्या व भैरवनाथ महाराजांच्या चांदीच्या मूर्र्तींची गावातून मिरवणूक काढण्यात आली. ढोलताशाच्या गजरात मिरवणूक विविध भागातून नेण्यात आली. यामुळे वातावरणात चैतन्य निर्माण झाले होते. नांदूरवैद्य येथे चैत्रपौर्णिमेनिमित्त भैरवनाथ महाराज यांचा यात्रोत्सव व हनुमान जन्मोत्सव साजरा केला जातो. यानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मंदिरात सकाळी सत्यनारायणाची पूजा मांडण्यात आली होती. यात्रोत्सवानिमित्त भैरवनाथ महाराजांच्या मूर्तीला अभिषेक करण्यात आला. सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. नवस फेडण्यासाठी भाविकांची मोठी रांग लागली होती. यानंतर ढोलताशाच्या गजरात देवाची सजवलेल्या बैलगाडीतून मिरवणुकीत काढण्यात आली. सहभागी अश्वांनी तालावर नृत्य सादर करून नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. मिरवणूक ग्रामदैवत भैरवनाथ महाराज यांच्या मंदिराजवळ आल्यानंतर भैरवनाथ महाराजांच्या मूर्तीचे विधिवत पूजन करण्यात आले. ठिकठिकाणी महिलांनी रथाचे पूजन करून देवाचे औक्षण केले.भैरवनाथ की जय, हनुमान की जयच्या जयघोषाने गाव परिसर दणाणून गेला होता. मिरवणुकीनंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. रात्री करमणुकीसाठी लोकनाट्याचा कार्यक्रम झाला.अश्वांचा नृत्याविष्कारयेथील यात्रोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे रथयात्रा व अश्वांचे नृत्य. विविध वाद्यांच्या गजरात मिरवणुकीला प्रारंभ झाला. यावेळी सहभागी अश्वांनी तालावर नृत्य सादर करून उपस्थित भाविकांच्या डोळ्याचे पेरणे फाडले. मिरवणुकीत लहानांपासून ते आबालवृद्धांनी सहभागी होत ठेका धरला. ‘भैरवनाथ महाराज की जय, बजरंगबली की जय’च्या जयघोषात मिरवणूक हळुहळू पुढे सरकत होती. मिरवणूक मारूती मंदिराजवळ आल्यानंतर भाविकांनी मारु तीचे पूजन करून दर्शन घेतले. भैरवनाथांच्या मुख्य मंदिराजवळ रथ आल्यानंतर येथे अश्वांच्या नृत्याची जुगलबंदी रंगली. त्यानंतर मंदिरात भैरवनाथ महाराजांचे विधिवत पूजन करण्यात येऊन आरती करण्यात आली. यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
भैरवनाथ यात्रेनिमित्त भाविकांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2018 12:23 AM