वणी : साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या सप्तशृंगगडावर यात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी ५० हजार भाविक सप्तशृंगीचरणी नतमस्तक झाले. आजपासून गड़ावर यात्रोत्सवास प्रारंभ झाला. चैत्र यात्रोत्सवात रामनवमी ते हनुमान जयंतीपर्यंतच्या कालावधीचा समावेश आहे. दुर्गाष्टमी व रामनवमी अशा दुग्धशर्करा योगात यात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यातून आलेल्या दर्शना र्थींची संख्या लक्षणीय होती. आज सकाळी भगवतीच्या अलंकाराची तसेच प्रतिमेची सवाद्य मिरवणूक न्यासाच्या कार्यालयापासून मंदिराच्या पहिल्या पायरीपर्यंत काढण्यात आली. न्यासाचे कार्यकारी मंडळ सदस्य, अधिकारी, ग्रामपंचायत कार्यकारी मंडळ व ग्रामस्थ या शोभा यात्रेत सहभागी झाले होते.भाविकांना महाप्रसादाचे वाटपआज रविवार सुटीचा दिवस असल्याने जिल्हाभरातील भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. सुमारे ३० ते ४० हजार भाविकांनी मोफत महाप्रसादाचा लाभ प्रसादालयात घेतला. ग्रामपालिका व न्यासाने स्वच्छतेस अग्रक्र म दिल्याचे दिसून आले. नवसफेडीसाठी काही भाविक पदयात्रा करत सप्तशृंगीचा जयघोष करून मार्गक्र मण करीत होते. चैत्र महिन्याच्या उन्हाची तीव्रता जाणवू नये याकरिता टोपी, उपरणे, गॉगल्स यांचा वापर करताना भाविक दिसून येत होते. भरजरी शालू, विविध अलंकार व विशेष सजावटीमुळे भगवतीचे रूप खुलून दिसत होते.
सप्तशृंगगडावर यात्रोत्सवानिमित्त भाविकांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 12:14 AM