त्र्यंबकेश्वर : चौथ्या सोमवारच्या पूर्व संध्येला रविवारची सुटी साधून भाविकांनी गर्दी केली होती. एरवी रिकाम्या असलेल्या दर्शनबारीच्या रांगा रविवारी मात्र सर्व भरलेल्या होत्या. तर मंदिरातदेखील देणगी दर्शन व धर्म दर्शनाकडील दोन्ही रांगा भरून मंदिरात भाविकांची अभिषेक, संकल्प पूजा, रुद्राभिषेक आदी पूजा करणाऱ्यांची गर्दी वाढत होती. शनिवार व रविवार या दोन्ही दिवशी सुट्यांचा फायदा घेऊन भाविकांची गर्दी वाढत असल्याचे चित्र दिसते.तिसºया श्रावण सोमवारीदेखील अपेक्षेप्रमाणे गर्दी झाली नव्हती. लोक मंदिरात येण्यापेक्षा प्रदक्षिणेला जाणे पसंत करीत होते. चौथा आणि अंतिम सोमवार तसेच जन्माष्टमीच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वरला भाविकांची यावेळी गर्दी होण्याची दाट शक्यता आहे.स्थानिक त्र्यंबकेश्वरचे काही जण मोठ्या प्रदक्षिणेला जात असतात. मोठी प्रदक्षिणा म्हणजे २० किमीची असते. तर नेहमीच्या प्रदक्षिणेचा मार्ग १० किमीचा असतो. माहितगार लोकच मोठ्या प्रदक्षिणेला जात असतात.कुशावर्तावरदेखील बºयापैकी गर्दी होती. तथापि गर्दीचे मुख्य ठिकाण त्र्यंबकेश्वर मंदिराचे पूर्व, पश्चिम व उत्तर गेट होते. धर्म दर्शन गेट पूर्व. देणगी दर्शन व व्हीआयपी प्रवेश उत्तर गेट. स्थानिक नागरिक पश्चिम गेट व बाहेर जाण्यासाठी दक्षिण गेटचा वापर करण्यात येत आहे. तसेच मंत्री व उच्च अधिकारी यांना कोठीच्या गेटने मंदिरात घेतले जाते. याप्रमाणे दर्शनाचे नियोजन केलेले आहे. आज अंतिम सोमवार असला तरी अजून ५/६ दिवस श्रावण महिना आहे. याशिवाय शनिवार व रविवारी अमावास्या आहे. सलग दोन दिवस सुट्या असल्याने या दोन्हीही दिवशी येथे गर्दी होईल, असा अंदाज आहे.
चौथ्या सोमवारच्या पूर्वसंध्येला त्र्यंबकेश्वरला भाविकांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2018 10:38 PM
त्र्यंबकेश्वर : चौथ्या सोमवारच्या पूर्व संध्येला रविवारची सुटी साधून भाविकांनी गर्दी केली होती. एरवी रिकाम्या असलेल्या दर्शनबारीच्या रांगा रविवारी मात्र सर्व भरलेल्या होत्या. तर मंदिरातदेखील देणगी दर्शन व धर्म दर्शनाकडील दोन्ही रांगा भरून मंदिरात भाविकांची अभिषेक, संकल्प पूजा, रुद्राभिषेक आदी पूजा करणाऱ्यांची गर्दी वाढत होती. शनिवार व रविवार या दोन्ही दिवशी सुट्यांचा फायदा घेऊन भाविकांची गर्दी वाढत असल्याचे चित्र दिसते.
ठळक मुद्दे जन्माष्टमीच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वरला भाविकांची यावेळी गर्दी होण्याची दाट शक्यता