नाशिकरोड : कार्तिक पौर्णिमेनिमित्त मुक्तिधाम व विहितगाव येथील श्री अण्णा गणपती नवग्रह सिद्धपीठम्मध्ये श्ुाक्रवारी श्री कार्तिक स्वामी मंदिरात दर्शनासाठी व मोराचे पीस वाहण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.मुक्तिधाम व नवग्रह सिद्धपीठम्मध्ये गुरुवारी रात्री शेकडो दीपप्रज्वलित करण्यात आले होते. बहुतांश भाविक सूर्योदयापासून लागलेली कार्तिक पौर्णिमा मानत असल्याने शुक्रवारी सकाळपासून भाविकांनी दर्शन व मोरपीस वाहण्यासाठी गर्दी केली होती. दोन्ही मंदिरात सकाळी विधीवत पूजा करण्यात आली. सायंकाळी उशिरापर्यंत भाविकांनी दोन्ही मंदिरात गर्दी केल्याने परिसराला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.
कार्तिक पौर्णिमेनिमित्त मंदिरांमध्ये गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 1:02 AM