शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
उद्धव ठाकरे यांची पंचसूत्री नव्हे तर थापासुत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
5
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
6
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
7
महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडा, उद्धव ठाकरे यांचा घणाघात; सामान्य जनभावना या सरकारविरोधात
8
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
9
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
10
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
11
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
12
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
13
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
15
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
16
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
17
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
18
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

कळसूबाईच्या दर्शनाला गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 12:03 AM

नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्याच्या हद्दीवर असलेल्या व भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कळसूबाई मातेच्या दर्शनासाठी बुधवारी कळसूबाई शिखरावर भक्तांनी अलोट गर्दी केली होती. राज्यातील सर्वात उंच शिखर म्हणून ओळखल्या जाणाºया कळसूबाई शिखरावरील कळसूबाई मातेचे दर्शन घेण्यासाठी भक्त नवरात्रोत्सव काळात गिर्यारोहणाची अनुभूती घेतात.

घोटी : नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्याच्या हद्दीवर असलेल्या व भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कळसूबाई मातेच्या दर्शनासाठी बुधवारी कळसूबाई शिखरावर भक्तांनी अलोट गर्दी केली होती. राज्यातील सर्वात उंच शिखर म्हणून ओळखल्या जाणाºया कळसूबाई शिखरावरील कळसूबाई मातेचे दर्शन घेण्यासाठी भक्त नवरात्रोत्सव काळात गिर्यारोहणाची अनुभूती घेतात.  राज्यातील सर्वात उंच शिखर असलेल्या कळसूबाई शिखरावर कळसूबाई मातेचे मंदिर आहे. नवरात्र काळात नाशिक जिल्ह्यासह नगर जिल्ह्यातील अनेक भाविक शिखरावर दर्शनाला गर्दी करतात. नवरात्रीत तिसºया, पाचव्या आणि सातव्या माळेला भाविकांची अलोट गर्दी उसळते. पहाटे ४ वाजेपासून भाविक हे शिखर चढण्यास सुरु वात करतात.  अवघड ठिकाणी लोखंडी शिड्या व साखळीचा आधार घेत भाविक मंदिराजवळ पोहचतात. दरम्यान, बुधवारी सातव्या माळीला मध्यरात्रीपासूनच भाविकांची रीघ लागली होती. यामुळे अरुंद शिड्यांवर भाविक अनेक तास अडकून पडल्याने गैरसोय झाली होती. देवीदर्शनाला राज्यभरासह विशेषत: मुंबईहून येणाºया भाविकांची संख्या मोठी आहे.देवगाव परिसराला यात्रेचे स्वरूपदेवगाव : नवसाला पवणारी देवी म्हणून देवगाव येथील देवी जगदंबा भवानीची महती आहे. या मातेची अंबाबाई म्हणूनही प्रसिद्धी आहे. नवरात्रोत्सवात भाविकांची गर्दी ओसंडून वाहते. भाविक नतमस्तक होऊन नवस करतात. तर काही नवस पूर्ण झाला म्हणून मनोभावे पूजा, होम-हवन करतात. नवरात्रोत्सवात रात्रंदिवस भाविकांची गर्दी होत असल्याने देवगाव परिसराला यात्रेचे स्वरूप आले आहे. देवगाव जेव्हा नावारुपाला येऊ लागले तेव्हा माहूर येथील कुशाबा बोचरे गृहस्थ येथे वास्तव्यास होते.नवसाला पावणारी देवी म्हणून देवगावच्या जगदंबेची महती आहे. नवरात्रोत्सवात येथे पुरुष व महिला घटी बसतात. ही परंपरा कै. खंडेराव पुंजाजी मेमाणे व कै. शंकर विष्णू कुलकर्णी यांनी सुरू केली. मंदिराचा जिर्णोद्धार झाल्यानंतर घटी बसणाºयाच्या संख्येत वाढ होत आहे. दत्तात्रय बोचरे, खंडू बोचरे, संपत बोचरे, विलास शिंदे, रामनाथ बोचरे, नामदेव बोचरे, गोपीनाथ मेमाणे, प्रशांत कुलकर्णी दत्तू बोचरे, ज्ञानेश्वर मेमाणे, रामनाथ घाडगे, हे पुरु ष तर जनाबाई बोचरे, रंगूबाई तळेकर या महिला घटी बसल्या आहेत.