येवला : तालुक्यातील कोटमगाव येथील महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती या तीन देवींच्या मुखांची ए कत्रित मूर्ती या ठिकाणी असल्याने श्री जगदंबा मातेचे हे देवस्थान इतर कोणत्याही देवस्थानापेक्षा वेगळी ओळख जपून आहे. मंदिराला मनमोहक अशी सुंदर रोषणाई करण्यात आली आहे.आमदार छगन भुजबळ पर्यटनमंत्री असताना सुमारे १४कोटी रु पये या देवस्थानच्या विकास कामांवर खर्च करण्यात आला. देवीच्या मंदिरात नवरात्रोत्सवात संपूर्ण परिसराला दहा दिवस जत्रेचे स्वरूप येते. देवस्थानच्या परिसरात घटी बसणार्या भाविकाची संख्या अडीच हजारापर्यंत गेली आहे. नवसफेड करणार्यांकडून नारळांची तोरणे बांधून, खारीक, शंकरपाळे यांची उधळण पाच, सात व नवव्या माळीला केली जाते. नवरात्रोत्सवात भाविकांची संख्या प्रचंड, परंतु सुविधा नसल्याने भाविकांना अनेक गैरसोयींना सामोरे जावे लागत होते. या पाश्र्वभूमीवर देवस्थानच्या पर्यटन विभागामार्फत झालेल्या विकासामुळे जगदंबामाता देवस्थानला विशेष महत्त्व देण्यात आले.विकासाच्या मार्गावर असलेल्या या देवस्थानच्या जुन्या भक्त निवासाचे नूतनीकरण, नवीन ४२ खोल्यांचे बांधकाम पूर्णत्वास गेले आहे. तीन मजली भव्य भक्तनिवासाचे कामही पूर्ण झाल्याने नवरात्रोत्सवात घटी बसणार्या भाविकांची उत्तम सोय झाली आहे. भक्तनिवास मध्ये सोलर बसविल्याने भाविकांना अंघोळीला गरम पाणी व पिण्यासाठी आर ओ सिस्टीमने शुद्ध पाणी मिळत आहे. पूजा साहित्य विक्र ीसाठी १६ गाळे तयार करण्यात आले आहेत. या गाळ्यांमुळे स्थानिकांना रोजगार मिळाला आहे. गर्दीच्या वेळी देवीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांमध्ये होणारी चढाओढ लक्षात घेऊन रांगांद्वारे प्रत्येकास व्यविस्थत दर्शन मिळावे म्हणून खास व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांच्या सोयीसाठी सार्वजनिक स्वच्छतागृह व शौचालयाचे काम झाल्याने अस्वच्छतेचा प्रश्न देखील मार्गी लागला आहे. देवस्थान परिसरास सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कुंपण बांधण्यात आले असून मुख्य प्रवेशद्वारासह बाहेर पडण्यासाठी स्वतंत्र दार करण्यात आले आहे.कायमस्वरूपी वीजपुरवठयÞासाठी ५० केव्हीचे जनित्र, वृद्ध, अपंग यांच्यासाठी पश्चिम बाजूला विशेष प्रवेशद्वार ठेवण्यात आले आहे. नवरात्रोत्सवात स्वच्छतेसाठी कर्मचार्यांसह १००स्वयंसेवक देखील कार्यरत आहे.मंदिर परिसरात यात्रे निमित्त सुमारे ३०० ते ४००स्टॉल लागले आहेत.कोटमगाव देवस्थानच्या विकासात परिसरातील सामाजिक संस्था, संघटना यांचाही मोलाचा वाटा आहे. घटी बसणार्या भाविकांसाठी येवला ते कोटमगाव अशी वाहनांची मोफत सेवा येवला येथील परेश्भाई मित्र मंडळ व रिक्षाचालक-मालक संघटना करतात. गेल्या ३५ वर्षांपासून संस्कृतीकार प्रभाकर झळके यांच्या मार्गदर्शनाखाली धडपड मंच या संस्थेच्या वतीने ‘मोफत चरणसेवा’ हा भाविकांची पादत्राणे सांभाळण्याचा उपक्र म राबविला जातो. सुमारे ७ कोटी रु पये खर्च करून उड्डाण पुलाणे देखील भाविकांची चांगली सोय केली आहे.रविवारी कोटमगावला भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणावर होती. त्यामुळे यंदा यात्रोत्सवात गर्दी वाढती आहे.
कोटमगाव जगदंबा मातेचे दर्शनाला गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 4:23 PM
येवला : तालुक्यातील कोटमगाव येथील महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती या तीन देवींच्या मुखांची ए कत्रित मूर्ती या ठिकाणी असल्याने श्री जगदंबा मातेचे हे देवस्थान इतर कोणत्याही देवस्थानापेक्षा वेगळी ओळख जपून आहे. मंदिराला मनमोहक अशी सुंदर रोषणाई करण्यात आली आहे.
ठळक मुद्देयेवल्यापासून पूर्व दिशेला तीन किलोमीटरवर औरंगाबाद-नाशिक मार्गावर कोटमगाव आहे. तीन मुखांची जगदंबेची मूर्ती बहुधा कुठेच पाहावयास मिळत नसावी. त्यामुळेच नवरात्रोत्सवात दहाही दिवस महाराष्ट्रासह शेजारील राज्यांमधूनही भाविक दर्शनासाठी येथे येत असतात.