शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

पांडवांनी साकारलेल्या महादेव मंदिरात गर्दी

By admin | Published: August 21, 2016 10:25 PM

पांडवांनी साकारलेल्या महादेव मंदिरात गर्दी

 पिंपळगाव घाडगा : इगतपुरी तालुक्यात भाविकांचे श्रद्धास्थानबेलगाव कुऱ्हे : इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव घाडगा येथील प्राचीन महादेव मंदिर हे जागृत देवस्थान असून, अनेक भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे. श्रावण सोमवारी येथे लांबवरून अनेक शिवभक्त दर्शनाचा लाभ घेतात.घोटी-शिर्डी या राज्य महामार्गापासून दोन किलोमीटर अंतरावर हे शिवमंदिर सर्वांचेच लक्ष वेधून घेते. या मंदिरात प्राचीन शिविलंग, तर शेजारी हनुमान मंदिर देखील आहे. प्रवेशद्वाराजवळ दगडी नंदीची मूर्ती जणू काही भक्तांना प्रेरणा देणारी आहे. या गावातील अनेक आबालवृद्ध आजही येथील पांडवकालीन मंदिराची परंपरा टिकवून ठेवताना दिसतात.येथील शिव मंदिराची स्थापना पांडवांनी केली असल्याचे गावातून सांगण्यात येते. मंदिराच्या आजूबाजूला पांडवांनी मोठ्या कुशलतेने कोरीव कामातून शिवगण, बुद्धमूर्ती, प्रवेशद्वाराजवळ गणेशमूर्ती व इतर नक्षीकामातून दगडी मंदिर साकारलेले दिसते. नाशिक येथील प्रसिद्ध पांडवलेणीप्रमाणे येथेही तसेच नक्षीकाम केलेले आहे. पिंपळगाव घाडगा येथील पांडवांनी साकारलेले शिवमंदिर त्यांच्या सुंदर कुशलतेचे प्रतीक आहे. शासनाने या शिवमंदिरासाठी सुखसुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी येथील पुजारी प्रभाकर महाराज यांच्यासह नागरिकांनी केली आहे.या जागृत शिवमंदिरात महान तपस्वी सरजुदास महाराज यांनी घोर तपश्चर्या करीत हे मंदिर पावन केले आहे. दरम्यान, येथून सर्वतीर्थ टाकेद हाकेच्या अंतरावर असल्यामुळे सर्वतीर्थाकडे जाणारे भाविक आवर्जून या जागृत महादेव मंदिराचे दर्शन घेऊनच पुढे मार्गक्र मण करतात. या मंदिरात श्रावण महिन्यात हरिनाम सप्ताहाचे आयोजनदेखील करण्यात येते. सह्याद्री पर्वतरांगेच्या कुशीत लपलेल्या या शिवमंदिरात शिर्डीकडे पायी जाणाऱ्या साईभक्तांचे निवासस्थान बनले आहे. पावसाळ्यात त्यांना मंदिराचा मोठा आधार मिळतो.