चांदोरी : येथील पंचमुखी महादेव मंदिरात श्रावण महिन्यात भाविकांची प्रचंड गर्दी होत असते. प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या चंद्रावती म्हणजेच चांदोरीचे ऐतिहासिक दृष्टीने महत्त्व सांगितले जाते.प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे वाढत जाणाऱ्या आकाराहून पडलेले चंद्रावती (चांदोरी) हे नाव असल्याचे सांगितले जाते.गोदावरी नदीच्या पात्रात तब्बल ८ महादेवाची मंदिरे आहेत. या पात्रात अनेक पिंड व नंदीच्या मूर्ती आहेत. गोदावरी नदीपात्रातील पाणी कमी झाल्याने साधारणत: सहाव्या शतकातील हेमाडपंती शैलीत बांधलेली ही मंदिरे अनेक पूर पाहूनही जैसे थे अवस्थेत आहेत. यावरून बांधकाम कलेचा उत्कृष्ट नमुना समोर येतो. क्वचित आढळणारे पंचमुखी महादेव मंदिर, लिंगायत समाजाचे नीलकंठेश्वर महादेव मंदिरही चांदोरी या गावात आहे.चांदोरी या गावाचा बाराव्या शतकात उल्लेख आलेला आहे. यातही या मंदिरांचा उल्लेख आढळतो.
चांदोरी येथील पंचमुखी महादेव मंदिरात गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 10:31 PM