मालेगाव : मुलांच्या परीक्षा संपून त्यांना उन्हाळ्याच्या सुट्या लागल्या असल्याने बालगोपाळांची मामाच्या गावाला जाण्यासाठी, तर लग्नसराईमुळे विवाह समारंभास जाणाºयांची नवीन बसस्थानकावर गर्दी होत असून, नवीन बसस्थानक फुलून जात आहे.यंदा उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून, ४४ अंशावर पारा गेल्याने अंगाची लाहीलाही होत आहे. अशातच बाहेरगावी जाणाºया प्रवाशांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. सकाळपासूनच नवीन आणि जुन्या दोन्ही बसस्थानकांवर महिलावर्गासह प्रवासी गर्दी करीत असून, बसेसमध्ये जागा मिळविण्यासाठी प्रवाशांची झुंबड उडत आहे. त्यात काही प्रवाशांचे एकमेकांशी जागेवरून वाद होत असून, काही प्रवाशांना मात्र खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे.नाशिकला जाणाºया विनाथांबा बसेस मालेगाव आगारातून निघून कुठेही न थांबता नाशिकला जात असल्याने बसमध्ये शिरण्यापूर्वीच प्रवाशांना रांगेत उभे राहून ‘तिकीट’ काढावे लागत असल्याने दिवसभर प्रवाशांच्या रांगाच रांगा लागलेल्या बघायला मिळत आहेत. धुळे-जळगावसाठी बाहेरगावहून येणाºया बसेसवरही प्रवाशांची झुंबड उडत आहे. परिणामी मालेगाव एसटी आगाराला जादा बसेस सोडाव्या लागत आहेत.बसमध्ये जागा मिळविण्यासाठी स्पर्धामालेगाव : सकाळपासूनच नवीन आणि जुने दोन्ही बसस्थानकांवर महिलावर्गासह प्रवासी गर्दी करीत असून, बसेसमध्ये जागा मिळविण्यासाठी प्रवाशांची झुंबड उडत आहे. त्यात काही प्रवाशांचे एकमेकांशी जागेवरून वाद होत असून, काही प्रवाशांना मात्र खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे.