लोहोणेर : हिंदू धर्मात सर्वात महत्त्वाचा सण म्हणून साजरा करण्यात येणाऱ्या दीपावलीच्या पर्वातील एक महत्त्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन. या दिवशी प्रत्येक घरी दिव्यांच्या लखलखाटात प्रत्येकजण लक्ष्मीची वाट पाहत असतो. या दिवशी सायंकाळी थाटामाटात करण्यात येणाऱ्या लक्ष्मीपूजनासाठी प्रत्येक घरी पूजेसाठी इतर पूजा साहित्याबरोबर नवी केरसुणी, बांबूच्या काड्यांची टोपली, सूप यांचीही मांडणी करून लक्ष्मी म्हणून पूजा केली जात असते. लक्ष्मीचे रूप म्हणून या साधनांकडे पाहिले जाते म्हणून सध्या आठवडे बाजारात केरसुणी, टोपली, सूप, पणती आदि पूजा साहित्याची जोरात खरेदी-विक्री चालू आहे. या साहित्याच्या खरेदीसाठी प्राधान्य दिले जात आहे. त्याबरोबरच अंगणात काढण्यासाठी रांगोळींचीही खरेदी महिलावर्गाकडून होत आहे. (वार्ताहर)
लक्ष्मीपूजनाच्या खरेदीसाठी गर्दी
By admin | Published: October 28, 2016 11:47 PM