नितीन शिंदे ।लोकमत न्यूज नेटवर्कठाणगाव : सिन्नरचे कोकण म्हणून ओळख असणाºया सिन्नर - ठाणगाव घाटात उंचावरून कोसळणारे धबधबे, वाºयाच्या वेगाने पुन्हा डोंगरावर जाणारे मनोहरी कारंजे असा निसर्ग अनुभवण्यासाठी ठाणगाव घाटात पर्यटकांची गर्दी होताना दिसत आहे.डुबेरवाडीच्या दक्षिणेस जसजसे पुढे जाऊ तसतसे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना डोंगरावरून कोसळणारे पांढरे शुभ्र धबधबे पर्यटकांना आकर्षित करत आहेत. पावसाळी पर्यटकांची मज्जा घेण्यासाठी अनेक ठिकाणाहून पर्यटक या परिसरात येताना दिसत आहे. यंदा उशिरा का होईना संततधार पडणाºया पावसामुळे धबधबे खळखळू लागले आहे. पाऊस आणि वाºयाच्या जुगलबंदीमुळे डोंगरावरून कोसळणाºया धबधब्याचे पाणी पुन्हा डोंगरावर उडून मन मोहून टाकणारा नजरा पहावयास मिळत आहे. डुबेरेपासून ठाणगावपर्यंतचा निसर्गरम्य परिसर सेल्फीप्रेमींसाठी खास आकर्षक ठरत आहे.ठाणगाव घाटातील देवीची खिंड ओलांडल्यानंतर पुढे डाव्या बाजूचा रस्ता पवनचक्कीकडे जातो. चारचाकी थेट डोंगरावर जात असल्याने निसर्गप्रेमी गर्दी करताना दिसत आहे. सिन्नर शहरापासून अवघ्या अर्ध्या तासांच्या अंतरावरील निसर्ग अनुभवण्यासाठी आबालवृद्धांना ठाणगाव घाटातील परिसर आकर्षित करू लागला आहे. ठाणगावमार्गे अनेक पर्यटक विश्रामगडाकडे जाताना दिसत आहे. परिसर हिरवाईने नटला आहे. गेल्या २० वर्षांपासून आम्ही निसर्गाच्या प्रेमात पडलो आहे. प्रत्येक वर्षी या परिसराला भेट देऊन निसर्गसौंदर्य न्याहळत असतो. पाऊस आणि त्यातून निर्माण झालेली हिरवी चादर पर्यटकांना आकर्षित करत असून, धबधबे बघून मन प्रसन्न होत आहे. जणू आपण महाबळेश्वरसारख्या ठिकाणावर आलोय की काय, असा भास होतो आणि मन प्रसन्न झाल्याशिवाय राहात नाही. - देवा सांगळे, पर्यटक, सिन्नर
निसर्ग अनुभवण्यासाठी सिन्नरला गर्दी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2020 10:47 PM
ठाणगाव : सिन्नरचे कोकण म्हणून ओळख असणाºया सिन्नर - ठाणगाव घाटात उंचावरून कोसळणारे धबधबे, वाºयाच्या वेगाने पुन्हा डोंगरावर जाणारे मनोहरी कारंजे असा निसर्ग अनुभवण्यासाठी ठाणगाव घाटात पर्यटकांची गर्दी होताना दिसत आहे.
ठळक मुद्देसिन्नरपासून अवघ्या १५ किलोमीटरवर असणाऱ्या ठाणगाव घाटातील ठाणगाव घाट : पांढºया शुभ्र धबधब्यांचे पर्यटकांना आकर्षण