कनाशी : कळवण तालुक्यातील चणकापूर धरणाबरोबर येथील धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. त्यामुळे येथे सुट्टीच्या दिवशी पर्यटक हजेरी लावून निसर्गाचा मनमुराद आनंद लुटत आहेत. तसेच चणकापूरधरण परिसरात निसर्गाने मुक्त हस्ते नैसर्गिक उधळण केली आहे. पावसाळ्यात येथील नैसर्गिक सौंदर्य अजून खुलते. या निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने दाखल होतआहेत.
धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2017 11:42 PM