मालेगाव : तालुक्यातील ९९ ग्रामपंचायतींच्या ९६९ जागांसाठी बुधवारी नामांकन अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी इच्छुकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत अंतिम मुदत असताना मुदतीच्या आत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कक्षात दाखल झालेल्या इच्छुकांनी रात्री उशिरापर्यंत अर्ज दाखल केले. ऑफलाइन अर्ज स्विकारण्याच्या निवडणूक आयोगाच्या संमतीमुळे इच्छुकांची धावपळ टळली होती. तालुक्यातील ग्रामपंचायतींसाठी येथील कॅम्प रोडवरील तहसील कार्यालयात व्यवस्था करण्यात आली होती. एका खाेलीत दोन किंवा तीन ग्रामपंचायतींचे काम करण्यात आले. नामांकन अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी तहसील कार्यालय आवारात गर्दी दिसून आली, तसेच कॅम्प रोड रस्त्यावरील इंटरनेट सेंटर, खाद्यपदार्थ विक्रेते, स्टॅम्प वेंडर, झेरॉक्स चालक, हॉटेल, चहा, फळे विक्रीचा व्यवसाय वाढला होता. तहसीलदार चंद्रजीत राजपूत यांनी नामांकन अर्ज प्रक्रियेची पाहणी करून अधिकाऱ्यांना सूचना केल्या. शांततेत नामांकन अर्ज दाखल प्रक्रिया पार पडली. गुरुवारी नामांकन अर्जांची छाननी केली जाणार आहे.
===Photopath===
301220\30nsk_13_30122020_13.jpg
===Caption===
मालेगाव तहसील कार्यालयात नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी इच्छूकांनी केलेली गर्दी.