लासलगाव : सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यात अंशत: निर्बंध शिथिल झाले आहेत. सकाळी ७ ते दुपारी २ या वेळेत अत्यावश्यक सेवा देणारे व्यवसाय सुरू झाले आहेत. रस्त्यावर मात्र सकाळच्या वेळेत मोठ्या प्रमाणात गर्दी पहायला मिळत आहे. लासलगावी सकाळच्या सत्रात मोठ्या प्रमाणात रस्त्यावर गर्दी होत असल्याने नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. निर्बंध शिथिल होताच आज घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या वाढली. एकीकडे कोरोना बाधित रुग्णांची संख्या कमी होत असताना नागरिक हलगर्जीपणा करताना दिसत आहेत. अनेक नागरिक आपल्या दुचाकी व चारचाकी वाहनातून गावात फेरफटका मारताना दिसून आले आहेत. परिणामी लासलगाव-विंचुर रोडवरील मार्केट चौफुलीवर दररोज सकाळच्या वेळात मोठी वाहतूक कोंडी होत होती. लासलगाव पोलीस कार्यालयाचे चार ते पाच कर्मचारी व होमगार्ड वाहतूक कोंडी सुरळीत करण्याचे काम करीत असतानाही अनावश्यक व विनाकारण फिरणारे दुचाकी व चारचाकी चालक पोलिसांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. अशा वाहनचालकांवर कारवाई करून वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याची मागणी नागरिक करीत आहेत. (०१ लासलगाव १)
===Photopath===
010621\01nsk_1_01062021_13.jpg
===Caption===
०१ लासलगाव १