दरम्यान, शुक्रवार सकाळी ७ ते १२ वाजेपर्यंत दुकाने लावण्यासाठी नगर परिषदेने जागा बदलून दिली असून तेथे आखणीही केली. मात्र नागरिक फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करीत नसल्याचे आढळून आले. त्यामुळे दुपारी १२ वाजेनंतर नगर परिषदेचे मुख्य अधिकारी अभिजित कदम, शेषराव चौधरी, सत्यवान गायकवाड, हर्षदा राजपुत, संजय गुरव यांनी दुकाने उठवून दिली. चांदवडच्या आठवडे बाजारात होणारी गर्दी लक्षात घेता नगर परिषदेने सदरचा भाजीबाजार चांदवड गणूररोडवरील टेलिफोन कार्यालयासमोर हलविला असून, त्याठिकाणी ठराविक अंतरावर दुकाने शिस्तबद्ध पद्धतीने लावण्यास परवानगी दिली आहे.
===Photopath===
140521\14mmg2.jpg
===Caption===
फोटोची ओळ 14 एम.एम.जी.2- चांदवड येथील भाजीमंडई बाजार गणूर रोडवर हलविण्यात आल्याने अक्षय तृत्तीयाच्या पाश्र्वभूमीवर येथे ग्राहकांनी केलेली गर्दी दिसत आहेत.