पांडाणे (श्यामराव सोनवणे) - साडेतिनशक्ती पिठापैकी आद्य पिठ असलेल्या सप्तशृंगी देवीच्या शारदीय नवरात्र उत्सोत्सवात प्रारंभ झाला असून दुस-या माळेला सोमवारी सकाळी दहा वाजता महापुजा करण्यात आली .उत्तर महाराष्ट्राची कुलदेवता सप्तशृंगी देवीची दुस-या माळेची महापुजा कळवणचे तहसिलदार बंडू कापसे, स्वाती कापसे, अथर्व कापसे, अर्जुन कापसे यांच्या हस्ते करण्यात आली. सप्तश्रृंगी मातेला आज पांढºया रंगाचा शालू घालण्यात आला होता . व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे , भगवान नेरकर, जनसंपर्क अधिकारी भिकण वाबळे , उपसरपंच राजेंद्र गवळी , प्रशांत निकम , किरण राजपूत यांच्या उपस्थितीत महाआरती करण्यात आली.शारदीय नवरात्र उत्सव काळात गडावर खासगी वाहनांना प्रवेश बंदी असल्यामुळे नांदूरी पायथ्यापासून परिवहन महामंडळाने तीन विभागातील २५० जादा बसची व्यवस्था करण्यात आली आहे . त्या बसेससासाठी तात्पुरते बसस्थानक उभारण्यात आले आहे . तेथे प्रवाश्यांना निवारा सेड व प्रसाधनग्रुहाची व्यवस्था करण्यात आली आहे . तसेच महाराष्ट्रातून राज्य परिवहन महामंडाळामार्फत गड ते नांदूरी , मालेगाव , धुळे , नंदूरबार , जळगाव , शहादा , तळोदा ,शिरपूर , नाशिक , नगर , व लांब पल्याच्या बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत . तसेच गडावर प्लास्टीक बंदी असल्यामुळे भाविकांनी बाहेरु न प्लास्टीक पिशव्या आणू नये असे ग्रांमपंचायत व न्यासाच्यावतीने आवाहन करण्यात आले आहे . शारदीय उत्सव काळात गडावर श्री भगवती मंदीर ते न्याच्या परिसर, शिवालय तलाव , न्यासाच्या स्वच्छता विभागामार्फत संपूर्ण स्वच्छता करण्यात येत आहे . या उत्सव काळात विश्वस्त डॉ रावसाहेब शिंदे , विश्वस्त राजेंद्र सुर्यवंशी , प्रकाश पगार न्यासाचे सुरक्षा अधिकारी पंडीत कळमकर , श्रीराम कुळकर्णी , शाम पवार, मुरलीधर गवळी , सामाजिक कार्यकर्ते संदीप बेनके , उपसरपंच राजेंद्र गवळी , प्रसादालय शेलार, विजय दूबे यांच्यासह ग्रामस्थ व न्यासाचे सर्वच कर्मचारी प्रयत्नशिल आहेत .
दुसऱ्या माळेला गडावर भाविकांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2019 12:41 PM