सिन्नर : येथील लाल चौकातील अगस्तीबाबांचा संदल उत्सव यंदाही अपूर्व उत्साहात पार पडला. यावेळी महाराष्टÑातील नावाजलेल्या ब्रास बॅण्डची जुगलबंदी अनुभवण्यास सिन्नरकरांनी मोठी गर्दी केली होती.सोमवारी दुपारी ४ वाजता नगराध्यक्ष किरण डगळे, उपनगराध्यक्ष प्रमोद चोथवे, मुख्याधिकारी व्यंकटेश दुर्वास, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, नगरसेवक हेमंत वाजे, पंकज मोरे, गोविंद लोखंडे, रमेश मुठे, विजय जाधव, पी. एल. देशपांडे, हरिश्चंद्र गुजराथी, वामन येलमामे आदींच्या उपस्थितीत अगस्तीबाबांच्या मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला. बारामती येथील मास्टर शकील झारी यांचा अमर ब्रास बॅण्ड, महाराष्टÑ गौरव पुरस्कार विजेता मास्टर फैजल चाऊस यांचा चाऊस ब्रास बॅण्ड, बी. आर. सोनवणे यांचा दोस्ती ब्रास बॅण्ड, मास्टर नसीर पठाण यांचा बाबुलाल ब्रास बॅण्ड यांची जुगलबंदी सुरू झाली. भक्तिगीते, देशभक्तीपर गीते, क्लासिकल गाणे, हिंदी-मराठी सिनेमांच्या नव्या-जुन्या गाण्यांवर रंगलेल्या जुगलबंदीचा आनंद लुटण्यासाठी सिन्नरकरांनी मोठी गर्दी केली होती. सूर निरागस होवो, हनुमान चालिसा, मनाचे श्लोक, सत्यम् शिवम् सुंदरम्, मेघा रे मेघा रे, यम्मा यम्मा, वन टु का फोर आदी गीतांवरील जुगलबंदीने सिन्नरकरांची विशेष पसंती मिळवली. लाल चौक मंडळाचे अध्यक्ष सतीश गुजराथी यांच्यासह पदाधिकाºयांच्या हस्ते चारही बॅण्डमालकांचा सत्कार करण्यात आला. सागर गुजर यांनी सूत्रसंचालन केले. गोविंद लोखंडे यांनी आभार मानले.
ब्रास बॅण्डची जुगलबंदी अनुभवण्यास गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2017 11:16 PM