======
चोरट्या मार्गाचा अवलंब
नाशिकरोड रेल्वे स्थानकाचे सर्व प्रवेशद्वार बंद असले तरी सिन्नरफाटा बाजूकडील प्लॅटफॉर्म क्रमांक चार, चेहेडी पंपिंग रस्त्याकडील रेल्वे स्थानकात येणारा रस्ता, मालधक्का, तसेच इतर ठिकाणहून भिंतीवरून उडी मारून रेल्वे स्थानकात प्रवेश करून रेल्वे विनातिकीट निघून जात आहे. याकरिता रेल्वे स्थानकाशी नेहमी संबंध येणारे काही इसम, प्रवेशद्वारावरील कर्मचारी आर्थिक मिलीजुली करून परप्रांतीयांना रेल्वे स्थानकात प्रवेश मिळवून देत आहेत.
चौकट====
जादा रेल्वे सोडण्याची गरज
मुंबई, ठाणे या भागातील परप्रांतीयांची आपल्या घरी जाण्यासाठी रेल्वे स्थानकाबाहेर गर्दी वाढू लागली आहे. अशीच परिस्थिती येत्या काही दिवसात नाशिकरोड रेल्वे स्थानकाबाहेर देखील निर्माण होऊ शकते. त्यामुळे गेल्या वर्षी प्रमाणे गोंधळ निर्माण होऊ नये म्हणून केंद्र शासनाने आत्ताच इतर राज्यात जाणाऱ्या रेल्वेची संख्या वाढवून भीती, घबराट, गोंधळ टाळण्यासाठी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.