ग्राहकांनी भाजी खरेदीसाठी एकच गर्दी केल्याने पुन्हा बाजाराचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गावापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर अक्षय तृतीयेपासून जीवनाश्यक बाब म्हणून भाजीपाला, फळांची दुकाने गणूर रोडवर हलविण्यात आली होती. मात्र व्यवसाय होत नाही हे कारण देत पुन्हा विक्रेत्यांनी सोमवारी आठवडे बाजारात दुकाने थाटली. यावेळी भाजीपाला, फळे घेण्यासाठी ग्राहकांनी मोठी गर्दी केली होती. दुपारी बारा वाजेनंतर पोलीस अधिकारी तसेच नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी अभिजित कदम, शेषराव चौधरी, सत्यवान गायकवाड, हर्षदा राजपूत, संजय गुरव व कर्मचाऱ्यांनी दुकाने हलविली.
दरम्यान, शहरात किराणा मालाच्या दुकानांवर थोड्याफार फरकाने गर्दी होती. पेट्रोल पंपांवर मात्र पेट्रोल घेण्यासाठी दुचाकी वाहनधारकांनी गर्दी केल्याचे दिसत होते.
फोटो- २४ चांदवड बाजार
चांदवड येथील भाजी बाजारात ग्राहकांनी केलेली गर्दी.
===Photopath===
240521\24nsk_22_24052021_13.jpg
===Caption===
फोटो- २४ चांदवड बाजार चांदवड येथील भाजीबाजारात ग्राहकांनी केलेली गर्द