सिन्नर : येथील पुरातन यादीवकालीन गोंदेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.लाकडी बांबूच्या सहाय्याने रांगा तयार करण्यात आल्या होत्या. दरवर्षी महाशिवरात्रीच्या दिवशी येथे भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी होत असते. शहर व परिसरातील भाविकांनी मनोभावे गोंदेश्वराचे दर्शन करुन पूजा केली. महिलांची विशेष गर्दी दिसून आली. मंदिर परिसरात महाशिवरात्रीनिमित्त स्वच्छता करण्यात आली होती. पहाटेपासूनच मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. मंदिराबाहेर फुलपानांची व प्रसादाची दूकाने थाटण्यात आली होती. भाविकांनी मंदिराच्या कलाकृतीची भुरळ पडल्याने मोबाईमध्ये फोटोसेशनसाठी सर्वचजण व्यस्त असल्याचे दिसत होते.
गोंदेश्वर मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 6:03 PM