सातपूर : युनियनमध्ये सहभागी होत नसल्याच्या कारणावरून सिअर्स कंपनीतील कामगारास मारहाण करणाऱ्या चौघा संशयित कामगारांसह सिटू युनियनचे राज्य अध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांच्यावर सातपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास सिअर्स कंपनी कामगार प्रवीण मेहेटकर (३९) गुरुवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास कंपनीतून घरी जात होते. यावेळी शिवाजीनगर कार्बन नाका चौकात नॅश ग्रुपच्याच सिम इंजिनिअरिंगमधील कामगार वैभव जगताप, दीपक पाटील, अनिल शार्दुल, मारहाण प्रकरणी कराड यांच्यासह चौघांवर गुन्हा रोहित भालेराव आणि त्यांच्या ७ ते ८ साथीदारांनी प्रवीणला आवाज देत रस्त्यात आडवले व बेदम मारहाण केली. प्रवीण जखमी झाल्याने त्यास जिल्हा शासकीय रु ग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, सिटू युनियनचे राज्य अध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांच्या सांगण्यावरून संशयित आरोपींनी मारहाण केल्याची फिर्याद प्रवीण मेहेटकर याने दिल्याने सातपूर पोलिसांनी डॉ. कराड यांच्यासह चार कामगार आणि ७ ते ९ अनोळखी इसमांच्या विरोधात सातपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक संदीप वºहाडे करीत आहेत.
मारहाण प्रकरणी कराड यांच्यासह चौघांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 12:58 AM