लोकमत न्यूज नेटवर्कसाकोरा : येथे गेल्या पाच महिन्यांपासून चालू असलेल्या दलितवस्ती सुधार योजनेंतर्गत उभारऱ्यात येत असलेली कमान आज अचानक आलेल्या वादळात जमिनीवर पडली. मात्र सुदैवाने शाळेला सुटी असल्याने जीवितहानी टळली.गेल्या दोन वर्षांपासून साकोरा परिसरात विविध योजनेंतर्गत विकासकामे सुरू आहेत. त्यांचा दर्जा कसा असेल हे आज झालेल्या हानीत लक्षात आले आहे.दलितवस्ती सुधार योजनेंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून ग्रामपंचायतीकडे वर्ग करून एकूण पाच लाख रुपये खर्चाच्या कमानीचे काम पाच महिन्यांपासून चालू होते. मात्र जागेच्या वादावरून कामाला स्थिगती आली होती़त्यानंतर समजूतदारपणामुळे सदरकाम केले कमान कशीतरी संबधित ठेकेदाराने पूर्ण करत अजूनही प्लॅस्टर बाकी असतानाच आज अचानक जोरदार वादळ सुरू झाल्याने ही कमान जमिनीवर अचानक कोसळली.
वादळात कमान जमीनदोस्त
By admin | Published: May 08, 2017 1:04 AM