नाशिक : इंडियन डेफ फिल्म प्रॉड््क्शन आणि डेफ वेल्फेअर फाउंडेशन नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने दादासाहेब गायकवाड सभागृह येथे राष्टय स्तरावरील भारतीय मूकबधिरांनी निर्माण केलेल्या लघुपट चित्रपटाचा आणि सांस्कृतिक महोत्सव नुकताच पार पडला.महोत्सवाचे उद््घाटन नॅब महाराष्टचे सहसचिव मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, बाळासाहेब कापसे, शोभा काळे, चित्रपट दिग्दर्शक व इंडियन फिल्म सोसायटीचे अध्यक्ष देवेंद्रसिंग राणा, सचिव सुमन भार यांच्या हस्ते करण्यात आले. इतिहासात प्रथमच ज्यांना बोलता येत नाही, जे केवळ खुणांच्या भाषेने संवाद करतात त्यांनी या राष्टय स्तरावर खुणांच्या भाषेतील लघु चित्रपट निर्माण केलेल्या कलाकृतीचा व अभिनयाचे दर्शन घडविण्यासाठी शहरात या आंतरराज्य चित्रपट व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन केले होते. यामध्ये राष्टय पातळीवर एकूण आठ चित्रपट सामाजिक व प्रबोधनात्मक समस्यांवर आधारित कथा आणि खुणांची भाषा ही मूकबधिरांसाठीच्या जीवनात याला मोठे महत्त्व असल्याचे ज्ञान समाजाला व्हावे म्हणून या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यात बुद्ध (केरळ), प्रेम स्टोरी (महाराष्ट), रन (महाराष्ट), रक्षाबंधन (कोलकाता), हेल्मेट (नाशिक), निलोपर व अभिजित (आसाम), राजखोबा (आसाम), भूत (पुणे), आयडोलाइझ (मणीपुर) या चित्रपटांचा समावेश होता. तसेच यावेळी फॅ शन मॉडेल व फोक डान्स स्पर्धेचे आयोजनही करण्यात आले होते. यावेळी डी. एस. राणा, सुमन ब्रार, संतोष नाडे, सचिन अभंग, किशोर कडेकर, असिफ शेख, ज्ञानेश्वर पाटील आदी उपस्थित होते.हे ठरले विजेतेलघुपटापैकी प्रथम महाराष्टचे ‘रन’ या चित्रपटाला, तर दुसरे पारितोषिक कोलकाताच्या ‘रक्षाबंधन’, तृतीय आसामच्या ‘निलोपर व अभिजित’ या चित्रपटांना पारितोषिक मिळाले. विजेत्यांना स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व रोख रक्कम पुरस्कार म्हणून देण्यात आले, तर उत्कृष्ट अभिनेता म्हणून कार्तिक (रन), तर उत्कृष्ट अभिनेत्री दीक्षा हिरासकर (प्रेमस्टोरी), उत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून सुमन बार यांना, तर उत्कृष्ट लेखक म्हणून मिझो जोशे (बुद्ध) यांची निवड झाली.
मूकबधिरांचा सांस्कृतिक कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 11:59 PM