उमराणे : येथील ग्रामहितवादी युवक संघटनेच्यावतीने आयोजित केलेला विविध कलागुणदर्शनाचा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. अध्यक्षस्थानी देवळा तालुका उपनिबंधक व उमराणे बाजार समितीचे प्रशासक संजय गिते उपस्थित होते. कार्यक्र माचे उद्घाटन चांदवड बाजार समितीचे सभापती डॉ.आत्माराम कुंभार्डे यांच्या हस्ते करण्यात आले.संघटनेचे प्रेरक स्व.रंगनाथ देवरे व रामदास देवरे यांच्या प्रतिमेचे पुजन सरपंच लताबाई देवरे यांनी केले. तर राजेंद्र देवरे यांनी पुष्पहार अर्पण केला. दिपप्रज्वलन जि.प.चे माजी सदस्य प्रशांत देवरे, जि.प.सदस्य यशवंत शिरसाठ,गजानन पतसंस्थेचे अध्यक्ष संजय खंडेराव देवरे व व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष खंडु देवरे यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्र मास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले कैलास देवरे यांना निहालचंद पाटणी यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा रामेश्वर गौरव पुरस्कार विनोद पाटणी व मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बाजार समितीचे माजी सभापती विलास देवरे,पं.स.सदस्य धर्मा देवरे, माजी सरपंच प्रकाश ओस्तवाल,बाजार समितीचे सचिव नितिन जाधव, केशव निवृत्ती देवरे, दिलीप देवरे,प्रविण बाफणा, सुभाष गायकवाड, विनोद हिरे, सचिन देवरे, बाळासाहेब देवरे, प्रकाश देवरे, सुभाष देवरे, संतोष बाफणा, महाविर जैन, वसंत रौंदळ, भरत देवरे, दिपक देवरे, सुनिल देवरे आदी मान्यवर उपस्थित होते. सुत्रसंचालन संघटनेचे सचिव राजेंद्र निळकंठ देवरे यांनी केले.
ग्रामहितवादी संघटनेच्यावतीने सांस्कृतिक कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2019 12:53 PM