कसबे सुकेणे : मौजे सुकेणे येथे कोरोनाबाधित आढळल्याने प्रशासनाने लागू केलेल्या कंटेन्मेण्ट झोनमध्ये संचारबंदी जारी केली आहे. ग्रामपंचायतीने युद्धपातळीवर उपाययोजना सुरू केल्या असून, दुसऱ्या दिवशीही सर्व व्यवहार बंद होते.मौजे सुकेणे येथे मुंबईहून आलेल्या ३२ वर्षीय तरुणास कोरोनाची लागण झाल्याने दोन दिवसांपासून संपूर्ण गावात संचारबंदी लागू आहे. रुग्णाचे राहते घर केंद्रबिंदू ठेवून शंभर मीटर परिसर कंटेन्मेण्ट झोन, तर दोन किमीचा परिसर बफर झोन म्हणून जाहीर केला असल्याने मौजे सुकेणे गावातून जाणारा कोकणगाव-सुकेणे-चांदोरी-सिन्नर रस्ता ओणे मार्ग वळविण्यात आला असल्याची माहिती सरपंच सुरेखा चव्हाण व उपसरपंच सचिन मोगल यांनी दिली.मौजे सुकेणे येथील झोनमध्ये चौदा दिवस वैद्यकीय पथक व साथरोग नियंत्रण सुरू राहणार आहे. त्यामुळे कसबे सुकेणे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव पाटील व तालुका वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी मौजे सुकेणेत तळ ठोकून आहेत.
मौजे सुकेणेत संचारबंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2020 10:41 PM