त्र्यंबकेश्वर : येत्या ६ ते ९ फेब्रुवारी दरम्यान होणारी संतश्रेष्ठ श्रीनिवृत्तिनाथ महाराजांची यात्रा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आलेली असल्याने यात्राकाळात मंदिर परिसरात भाविकांची गर्दी होऊ नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करत संचारबंदी लावण्यात येणार आहे. त्याबाबतचा आढावा उपविभागीय तथा प्रांताधिकारी तेजस चव्हाण यांनी बैठकीत घेतला.बैठकीत तेजस चव्हाण यांनी सांगितले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी संत निवृत्तिनाथ महाराज यात्रा होणार नाही. तरीही भाविकांची गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच दि. ६ ते ९ फेब्रुवारी या कालावधीत श्री निवृत्तिनाथ महाराज मंदिर परिसरात संचारबंदी लावण्यात येणार असून मंदिर परिसरात चारही बाजूंनी बॅरिकेडिंग करून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. या चार दिवसांत हॉटेल्स, लॉजिंग आदी ठिकाणी निवासाला प्रतिबंध लावण्यात आले आहेत. दरम्यान, यात्रा कालावधीत नियमित पारंपरिक पूजा विधी समाधी संस्थानचे मावळते विश्वस्त मंडळ करणार आहे. तर शासकीय महापूजा करण्यासाठी पालकमंत्री छगन भुजबळ यांना निमंत्रण देण्यात येणार आहे. त्र्यंबकेश्वर तहसील येथे झालेल्या या बैठकीस निवासी नायब तहसीलदार तथा प्र.तहसीलदार रामकिसन राठोड, नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, नगरसेवक स्वप्नील शेलार, विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष पवन भुतडा पुजारी तथा विश्वस्त जयंत महाराज गोसावी, मधुकर लांडे, त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे प्रशासनिक अधिकारी समीर वैद्य, मुख्य कार्यकारी अधिकारी राजाभाऊ जोशी आदी उपस्थित होते.निवडक लोकांनाच प्रवेशमहापूजेसाठी निवडक लोकांना पासेस देण्यात येणार आहेत. पासेस पाहून व कोरोनाचे नियम पाळूनच भाविकांना आत सोडण्यात येणार आहे. यात्रा कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी रद्द करण्यात आलेली असल्याने भाविकांनी गर्दी करू नये, असे आवाहनही प्रांताधिकारी तेजस चव्हाण यांनी केले.
यात्रा काळात निवृत्तिनाथ मंदिर परिसरात संचारबंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2021 8:38 PM
त्र्यंबकेश्वर : येत्या ६ ते ९ फेब्रुवारी दरम्यान होणारी संतश्रेष्ठ श्रीनिवृत्तिनाथ महाराजांची यात्रा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आलेली असल्याने ...
ठळक मुद्देप्रांताधिकारी : भाविकांना गर्दी न करण्याचे आवाहन