शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
5
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
6
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
7
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
8
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
9
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
10
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
11
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
12
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
13
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
14
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
15
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
16
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
17
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
18
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
19
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
20
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत

संचारबंदीचे उल्लंघन; ४७ जणांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2020 11:10 PM

नाशिक : शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत लॉकडाऊन दरम्यान कोरोनाचा ससंर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडू नये, यासाठी शासनाने वारंवार प्रतिबंधात्मक आदेश जारी करूनही अनेक नागरिक विनाकारण घराबाहेर पडत असल्याने सोमवारी (दि.२२) आजाराच्या प्रादुर्भावाचे गांभीर्य न बाळगता संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या ४७ नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अशाप्रकारे नाशिक शहरात २२ मार्च ते २२ जून या कालावीत एकूण ८ हजार ७८० गुन्हे दाखल करून संबंधितांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

ठळक मुद्दे२ हजार २१३ वाहने पोलिसांनी जप्त दणका : ८ हजार ७८० जणांवर गुन्हे दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत लॉकडाऊन दरम्यान कोरोनाचा ससंर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडू नये, यासाठी शासनाने वारंवार प्रतिबंधात्मक आदेश जारी करूनही अनेक नागरिक विनाकारण घराबाहेर पडत असल्याने सोमवारी (दि.२२) आजाराच्या प्रादुर्भावाचे गांभीर्य न बाळगता संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या ४७ नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अशाप्रकारे नाशिक शहरात २२ मार्च ते २२ जून या कालावीत एकूण ८ हजार ७८० गुन्हे दाखल करून संबंधितांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सर्व नागरिकांनी मास्क वापरण्याबाबतचे आदेश निर्गमित करण्यात आलेले असतानाही त्यांचे गांभीर्य न घेता ज्या नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्कचा वापर केला नाही अशा २४ इसमांवर सोमवारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अशाप्रकारे आतापर्यंत तीन हजार ३३० जणांवर मास्क वापरला नाही म्हणून कारवाई करण्यात आलेली आहे, तर शहर वाहतूक शाखेतर्फे २५ मार्च ते २१ या कालावधीत मोटार वाहन कायद्याच्या विविध कलमाअंतर्गत कारवाई एकूण ६१ लाख २ हजार ५०० रुपये दंड करण्यात आला आहे. त्यापैकी ८ लाख ६६ हजार ३०० रुपये वसूल करण्यात आला असून, ५२ लाख ३६ हजार दोनशे रुपये दंडवसूल करणे बाकी असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.तसेच कोरोनाची लागण होऊ नये यासाठी सर्वांना मास्कचा वापर बंधनकारक करण्यात आला. तरीदेखील काही नागरिक मास्क वापरत नसल्याने त्यांच्यावरही गुन्हे दाखल केले आहेत. त्यानुसार शहरात १ हजार ५८७ नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेआहे.लॉकडाऊनच्या काळात कोरोनाबाबत जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, कोरोना बरा होण्याचे चुकीचे उपाय यांसह विविध अफवा सोशल मीडियावर पसरविल्या प्रकरणी आठ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सात पोलीस ठाण्यांच्या हद्दीत मोहीम सर्वाधिक २९५ वाहने नाशिकरोड, त्याखालोखाल २९२ वाहने सातपूर पोलिसांनी जप्त केली आहेत. ही वाहने बॉण्डद्वारे परत देण्यास सुरुवात केली असल्याचे पोलीस प्रशासनाने सांगितले.

परिमंडळ एकमधील सात पोलीस ठाण्यांच्या हद्दीत पाच हजार २४९ आणि परिमंडळ दोनमधील सहा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत तीन हजार १७० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.सरकारवाडा पोलीस ठाण्यात सर्वाधिक १ हजार ३१३ गुन्हे, तर त्याखालोखाल १ हजार २८० गुन्हे गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दाखल करण्यात आले आहेत अशा नागरिकांची २ हजार २१३ वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत.

टॅग्स :Police Stationपोलीस ठाणेCrime Newsगुन्हेगारी