क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती दि. ३ जानेवारी हा दिवस शासनाने महिला शिक्षक दिन म्हणून साजरा करण्याचे जाहीर केले आहे. त्यानिमित्त महात्मा जोतिबा व सावित्रीबाई फुले यांनी केलेली समाजसुधारणा व मागासवर्गीय समाजातील मुलींना शिक्षण देताना कोणत्या अडचणींवर कशी मात केली. या विषयावर हे नाटक हिंदी भाषेत सादर करण्यात येणार आहे. राजेश शर्मा यांनी हे नाटक लिहून दिग्दर्शित केले आहे. संगीतकार दिनकर दांडेकर यांनी संगीत दिग्दर्शन केले आहेत. नेपथ्य शैलेंद्र गौतम, प्रकाश योजना रवी रहाणे करणार आहेत. जाधव रंगभूषा तर संतोष झेंडे वेशभूषा करणार आहेत. दि. ३ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता विनामूल्य होणाऱ्या या प्रयोगाला उपस्थित राहण्याचे आवाहन माजी समाज सेवा समितीचे अध्यक्ष विजय राऊत, बाजीराव तिडके यांनी केले आहे. नाशिकचे ४० कलावंत हे क्रांतिसूर्य नाटक सादर करून कोरोनाच्या पार्श्वभूमीवरही समाजजागृती करणार असल्याचे या नाटकातील कलावंतांनी सांगितले. कोरोनासंदर्भात असलेले सर्व नियम पाळून या नाटकाचे सादरीकरण होणार असल्याचे सुरभी थिएटर प्रस्तुत, जोश फाऊंडेशन वतीने सूत्रधार योगेश कमोद यांनी सांगितले.
क्रांतिसूर्यने उघडणार कालिदासचा पडदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2021 4:10 AM