नाशिक : भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) लागू केलेल्या नव्या नियमांमुळे १ फेब्रुवारीपासून देशभर दूरचित्रवाहिन्या पाहण्यासाठीचे समान शुल्क निश्चित करण्यात आले असून, ग्राहकांना त्यांच्या आवडीचे चॅनल निवडण्याचे स्वातंत्र्य दिलेआहे. परंतु, या नव्या व्यवस्थेच्या अंमलबजावणीसाठी केबल चालकांसोबतच डीटीएच कंपन्यांक डूनही सहकार्य मिळत नसल्याने ग्राहकांना डीटीएच कंपन्यांनी तयार केलेले पॅकेज अथवा प्रक्षेपण करणाऱ्या कंपन्यांचे पॅकेज घ्यावे लागत नसल्याने ग्राहकांना अजूनही नको असलेल्या अनेक चॅनलचे पैसे भरावे लागत आहे. तर ग्रामीण भागात काही ठिकाणी अजूनही साडेतीनशे ते चारशे रुपये महिन्यांचे पॅकेज ग्राहकांवर लादले जात असल्याचा प्रकार सुरू आहे. विशेष म्हणजे ट्रायच्या नवीन नियमांची अंमलबजावणी सुरू होऊन महिनाभराचा कालावधी उलटूनही चॅनल निवडताना अडचणींचा सामना करावा लागत असल्याने ग्राहकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.ग्राहकांना आपल्या आवडीच्या वाहिन्या पाहण्यासाठी नवे नियम लागू होऊनही त्यांची अंमलबजावणी होत नसल्याने जुन्याच पॅकजचे रिचार्ज करण्याची वेळ ग्राहकांवर आली आहे. त्यामुळे ग्राहकांना अनावश्यक वाहिन्यांसाठीही शुल्क भरावे लागत असून, ट्रायच्या नवीन नियमांनंतरही केबल आॅपरेटर आणि ब्रॉडकास्टिंग कंपन्यांकडून ग्राहकांसाठी खुल्या पद्धतीने आवडीचे एक-एक चॅनल निवडण्यासाठी अपेक्षित मदत मिळत नाही. केबल अथवा प्रक्षेपित वाहिन्यांवरून पॅकज निवडण्याची प्रक्रिया अतिशय किचकट आहे. प्रक्रियेचे संपूर्ण ज्ञान नसल्याने ग्राहकांना ट्रायच्या नव्या नियमानुसार मनोरंजनाचा आनंद घेता येत नाही. ट्रायच्या नवीन नियमानुसार देशभरात वाहिन्यांचे एकसमान दरपत्रक ठरवण्यात आले आहे. त्यामध्ये सशुल्क वाहिन्यांवरील कार्यक्रम पाहण्यासाठी पाच पैशापासून ते १९ रुपयांपर्यंत किमती ठरवण्यात आल्या आहेत.तसेच चॅनल निवडीचे स्वातंत्र्य मिळाल्यामुळे पहिल्या १०० नि:शुल्क वाहिन्या आणि त्यानंतर आपल्याला हव्या असलेल्या सशुल्क वाहिन्या अशी ग्राहकांना निवड करावी लागणार आहे. त्यामध्ये १५३ रुपये ४० पैशांचा बेसिक पॅक घेऊन त्यानंतर आपल्याला हव्या त्या सशुल्क वाहिन्या असे हे गणित असले तरी केबलचालक आणि डीटीएच कं पन्यांकडून ग्राहकांना अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याने ग्राहकांना अजूनही अनावश्यक तथा बिगर आवडीच्या चॅनलचेही पैसे मोजावे लागत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
मनोरंजन वाहिन्यांची निवड करण्यात ग्राहकांच्या अडचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 1:06 AM
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) लागू केलेल्या नव्या नियमांमुळे १ फेब्रुवारीपासून देशभर दूरचित्रवाहिन्या पाहण्यासाठीचे समान शुल्क निश्चित करण्यात आले असून, ग्राहकांना त्यांच्या आवडीचे चॅनल निवडण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. परंतु, या नव्या व्यवस्थेच्या अंमलबजावणीसाठी केबल चालकांसोबतच डीटीएच कंपन्यांक डूनही सहकार्य मिळत नसल्याने ग्राहकांना डीटीएच कंपन्यांनी तयार केलेले पॅकेज अथवा प्रक्षेपण करणाऱ्या कंपन्यांचे पॅकेज घ्यावे लागत नसल्याने ग्राहकांना अजूनही नको असलेल्या अनेक चॅनलचे पैसे भरावे लागत आहे.
ठळक मुद्देट्रायच्या नियमांना हरताळ : डीटीएच कंपन्या, केबलचालकांनी लादले पॅकेज