नाशिक : रिझर्व्ह बँकेने आर्थिक निर्बंध लादल्यामुळे पंजाब अॅण्ड महाराष्ट्र को-आॅपरेटिव्ह बँक अडचणीत आली आहे. आरबीआयच्या निर्बंधामुळे बँकेतून पैसे काढण्यावरही मर्यादा आल्याने ग्राहकांनी बँकेच्या शरणपूररोडवरील शाखेत सकाळी बँक उघडल्यापासूूनच गर्दी केली. यात काही महिलांनी आपल्या कष्टाची पुंजी परत मिळविण्यासाठी आपल्या लहानमुलांना सोबत घेऊन खात्यामधून पैसे काढण्यासाठी रांगा लावल्या. परंतु शाखा व्यवस्थापकांनी एका ग्राहकाला केवळ एक हजार रुपयेच देण्याची तयारी दर्शविल्याने ग्राहकांनी संताप व्यक्त करीत आपल्या खात्यातून पैसे काढण्याचा आग्रह धरल्याने बँकेत गोंधळ निर्माण झाल्याने पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.पंजाब अॅण्ड महाराष्ट्र को-आॅपरेटिव्ह बँकेवर भारतीय रिझर्व्ह बँकेने मंगळवारी (दि.२४) निर्बंध लादल्याने बँकेचे व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस यांनी बँकेच्या स्थितीची जबाबदारीस्वीकारत ग्राहकांना सहा महिन्यांत ही परिस्थिती सुधारण्याविषयी आश्वासित केले. मात्र त्याने ग्राहकांचे समाधान झाले नाही. उलट ग्राहकांमध्ये बँक बंद होणार, आपले पैसे बुडणार या भीतीने बँकेच्या शरणपूररोडवरील शाखेत ग्राहकांनी पैसे काढण्यासाठी गर्दी करून शाखा व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांना जाब विचारण्यास सुरुवात केली. त्यामुळे बँकेत गोंधळ निर्माण झाल्याने बँक प्रशानाने
निर्बंधानंतर ‘पीएमसी’वर ग्राहकांच्या रांगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 1:19 AM