शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावर ‘सायकल ट्रॅक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 10:57 PM

पर्यावरणाचा विचार करता सायकलप्रेमींसाठी नाशिक ते त्र्यंबकेश्वर या २९ किलोमीटर अंतरातील रस्त्याच्या दुतर्फा सायकल मार्ग करण्याचा निर्णय जिल्हाधिकाºयांनी घेतला असून, त्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या नावीन्यपूर्ण योजनेतून निधीची उपलब्धता करण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे२९ किलोमीटर अंतरातील रस्त्याच्या दुतर्फा सायकल मार्ग नावीन्यपूर्ण योजनेतून निधीची उपलब्धता सायकलप्रेमींसाठी हा सायकल मार्ग चांगला

नाशिक : पर्यावरणाचा विचार करता सायकलप्रेमींसाठी नाशिक ते त्र्यंबकेश्वर या २९ किलोमीटर अंतरातील रस्त्याच्या दुतर्फा सायकल मार्ग करण्याचा निर्णय जिल्हाधिकाºयांनी घेतला असून, त्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या नावीन्यपूर्ण योजनेतून निधीची उपलब्धता करण्यात येणार आहे.  नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्याचे चौपदरीकरण करतानाच सार्वजनिक बांधकाम खात्याने या मार्गावर एका बाजूला सायकल मार्ग व दुसºया बाजूला त्र्यंबकेश्वर यात्रेसाठी पायी जाणाºया भाविकांसाठी पायी मार्गासाठी जागा सोडलेली आहे. या प्रशस्त मार्गावरील एकूणच नैसर्गिक वातावरण व पर्यावरणाचा विचार करून दररोज शेकडो सायकलस्वार सकाळी फेरफटका मारण्यासाठी जात असतात. जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम राधाकृष्णन यांनीदेखील याच मार्गावरून प्रवास केलेला असल्याने या रस्त्याच्या बांधणीचा विचार करता, नाशिककर सायकलप्रेमींसाठी हा सायकल मार्ग चांगला होऊ शकतो हे पाहून त्यांनी या रस्त्यावर सायकलीसाठी स्वतंत्र मार्ग असावा म्हणून दुभाजक टाकण्याचाही निर्णय घेतला आहे. मुंबईला महानगर विकास प्राधिकरणाने साधारणत: तीन इंच उंचीचे प्लॅस्टिकचे दुभाजक टाकण्यात आलेले आहेत, त्याच धर्तीवर संपूर्ण रस्त्यावर दोन्ही बाजूने दुभाजक टाकण्यात येणार असून, एकाच वेळी या मार्गावरून दोन सायकलस्वार ये-जा करू शकतील असे त्यासाठी नियोजन आहे. त्यासाठी येणाºया खर्चाचे अंदाजपत्रक तयार करण्याचे आदेश  जिल्हाधिकाºयांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधीक्षक अभियंत्याना दिले आहेत. त्यासाठी येणाºया खर्चासाठी निधीची तरतूद नियोजन समितीच्या नावीन्यपूर्ण योजनेतून करण्यात येणार आहे.यात्रोत्सव काळात सायकल मार्गावर बंधने नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावर भाविकांना पायी जाण्यासाठी स्वतंत्र जागा सोडण्यात आली आहे. भाविक त्याचा वापरही मोठ्या प्रमाणावर करतात. साधारणत: जानेवारी महिन्यात त्र्यंबकेश्वर येथे श्री संत निवृत्तिनाथ यात्रा भरते. या काळात विशिष्ट कालावधीसाठी पायी मार्गावरून सायकलीचा वापर करता येणार नाही. अन्य वेळी मात्र रस्त्याच्या दुतर्फा सायकल मार्गाचा सर्वांना वापर करता येणार आहे.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयNashikनाशिक