इंदिरानगर/नाशिक : कलानगरकडून वडाळा कडे जाणाऱ्या सायकल स्वराला अज्ञात चारचाकीने धडक दिल्याने झालेल्या अपघातात सायकलस्वार युवक धर्मेंद्र बिशी (१७) ठार झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणात इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार धर्मेंद्र प्रकाश बिशी ( १७,रा. पद्मा अपार्टमेंट, बापू बंगल्याजवळ इंदिरानगर ). मंगळवारी (दि.११) रात्री साडेनऊ वाजता कलानगरकडून सायकलवरून वडाळाकडे जात असताना गणेश सिग्नोफिया अपार्टमेंटसमोर भरधाव वेगातील कारने त्यासा धडक दिली. या अपघातात धर्मेंद्र याच्या डोक्याला, छातीला व दोन्ही हातांना गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे धर्मेंद्र याला एका खाजगी रुग्णालयात औषधोपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र शनिवारी (दि.१५ ) दुपारी दीड वाजेच्या सुमारास त्याचा औषधोपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणात इंदिरानगर पोलिस ठाण्यात अज्ञात वाहनधारकां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.