पानिपत ते नाशिक सायकल मोहीम यशस्वी करणाऱ्या सायकलपटूंसमवेत डॉ. आबा पाटील, संजय पवार आदी.घोटी : जिल्ह्यातील सायकलिस्ट मित्रांनी ‘पानिपत-नाशिक’ असा ऐतिहासिक प्रवास करत पानिपत मोहीम फत्ते केली. या प्रवासात शेकडो मराठी माणसांच्या डोळ्यांनी शूरांच्या शौर्याला नेत्रदीपक उजाळा देणाºया नाशिक जिल्ह्यातील सायकलिस्ट मित्रांना सलाम केला.जिल्ह्यातील विविध भागातील सायकलिस्ट चर्चेत पानिपतचा विषय घेतात. ती रणभूमी सर्वांना सतत खुणावत असते. पानिपत जिंकून येण्याचे साहस सर्वांना करायचे होते. २१ ते ७४ वयोगटातील ३६ सायकलिस्ट मावळे पानिपतच्या ऐतिहासिक साहस वारीसाठी सज्ज झाले. मोहिमेअगोदर त्यांनी पानिपत व तानाजी हे दोन्ही सिनेमे बघितले. त्यातून जोश निर्माण झाला. नाशिकला छत्रपती शिवाजी महाराज व राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास वंदन करून पानिपतच्या दिशेने सर्वांनी कूच केले. पानिपतमध्ये पोहोचल्यानंतर नाशिकच्या ३६ सायकलस्वारांनी प्रथमच एका गणवेशात शिस्तबद्ध पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्या नावाचा जयघोष करत चैतन्य निर्माण केले. या जयघोषाने पानिपतमध्ये छत्रपतींचे मावळे आहेत या नजरेने सर्व नागरिक पहात होते. स्थानिक पोलीसांनी स्वयंस्फूर्तीने सायकलस्वारांना सहकार्य केले. या रणभूमीत महाराष्ट्रातील धारातीर्थी पडलेल्या मराठा वीरांना मानवंदना देण्यात आली. रणभूमीवरची माती माथ्याला लावण्यात आली. यावेळी मराठा स्फूर्तिगीतांचे गायन करून अजिंक्य रामशेज किल्ल्याची माती पानिपतच्या मातीत एकजीव करून पानिपतची माती सोबत घेतली. तिथूनच पानिपत ते नाशिक सायकल वारी आवेशात सुरू झाली.पानिपत मोहिमेचे शिलेदार डॉ. आबा पाटील यांनी सर्व वीरांची ओळख करून दिली. महाराष्ट्र गीत व स्फूर्तिगीत गाऊन कार्यक्र माची सांगता झाली.
सायकलस्वारांकडून पानिपत मोहीम यशस्वी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2020 11:22 PM
पानिपत ते नाशिक सायकल मोहीम यशस्वी करणाऱ्या सायकलपटूंसमवेत डॉ. आबा पाटील, संजय पवार आदी. घोटी : जिल्ह्यातील सायकलिस्ट मित्रांनी ...
ठळक मुद्देइगतपुरी । ठिकठिकाणी स्वागत, एकाच गणवेशात केले प्रस्थान