नाशिक : कोरोनाच्या संकटाचा सामना करत असतानाच निसर्ग चक्रीवादळाच्या प्रभावामुळे जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पावसाने हजेरी लावली. चक्रीवादळामुळे मंगळवारी (दि. २) रात्रीपासूनच जिल्ह्यात ठिकठिकाणी पावसाला सुरुवात झाली होती. बुधवारी (दि. ३) दिवसभर कुठे जोरदार तर कुठे रिमझिम पाऊसधारा कोसळल्या. या पावसामुळे सप्तशृंगी गडावर दरड कोसळली. कोरोनामुळे मंदिर दर्शनासाठी बंद असल्याने मार्गावरील वाहतूकही बंद आहे. दिंडोरी निसर्ग चक्र ीवादळाचा मार्ग दिंडोरी-वणी असल्याच्या हवामान खात्याच्या अंदाजाने भीतीग्रस्त असलेल्या जनतेला वादळाचा मार्ग बदलल्याने दिलासा मिळाला. मात्र, झालेल्या पावसाची नोंद ६०.१४ करण्यात आल्याने बळीराजा सुखावलाआहे. मंगळवार रात्रीपासून तालुक्यात रिमझिम पाऊस सुरू झाला होता. बुधवारी दुपारी रिमझिम पडणारा पाऊस वाऱ्याच्या वेगासह वाढल्याने अनेकांच्या मनात भीतीचा गोळा उठला होता. मात्र वादळाची दिशा बदलत वाºयाचा वेग कमी राहत पावसाच्या जोरदार सरी कोसळल्याने सर्वांना दिलासा मिळाला आहे. तालुक्यात एक कच्चे घर, एक शेडनेटचे किरकोळ नुकसान व काही कारल्याच्या बागांचे नुकसान झाले आहे.दमदार पावसामुळे शेतकऱ्यांची आज बाजारात आवश्यक साहित्य खरेदीसाठी गर्दी झाली होती. प्लॅस्टिक कागद घेण्यासाठी झुंबड उडाली होती.---------------------बागलाण तालुक्यात २३ घरांची पडझडसटाणा : तालुक्यातील राहुड येथे तब्बल सव्वीस जनावरे या पावसाच्या तडाख्याने मृत्युमुखी पडली. आमदार बोरसे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून तत्काळ पंचनामे करून स्वत: त्यावर सह्या केल्या तसेच घरे पडून झालेल्या नुकसानीचे तसेच जनावरे दगावल्याचे पंचनामे करून त्याचा अहवाल तातडीने पाठवावा, अशा सूचना तहसीलदार जितेंद्र इंगळे पाटील यांना दिल्या.
चक्रीवादळाने जनजीवन विस्कळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2020 9:15 PM