नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील सर्वतीर्थ टाकेद येथील घोरपडे मळ्यालगत असलेल्या झापवस्तीमधील झालेल्या गॅस सिलिंडरच्या स्फोटातील घटनास्थळाची तहसीलदारांनी पाहणी केली.टाकेद येथील पोपट चिंधू भांगे यांच्या घरातील एचपी गॅस सिलिंडरने अचानक पेट घेऊन स्फोट झाला होता. सदर गॅस सिलिंडरच्या स्फोटात आदिवासी कुटुंबातील शेतकरी तरु ण पोपट चिंधू धादवड यांच्या संपूर्ण घराचे नुकसान झाले होते. या दुर्घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी स्फोटात पोपट धादवड यांचे सर्व महत्त्वाची कागदपत्रे, घरातील रोजच्या वापरातील भांडी, रोख रक्कम, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, धान्य यांसह शेती उपयोगी वस्तू व संपूर्ण घर या आगीत भस्मसात झाले होते. यात पोपट धादवड यांची अंदाजे चार-पाच लाखांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, या दुर्घटनेची माहिती इगतपुरी तालुक्याच्या तहसीलदार अर्चना भाकड (पागिरे) यांना व घोटी ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे यांना समजताच घटनास्थळी दाखल होत पाहणी केली असता त्यांनी सदर घटनेचा तात्काळ पंचनामा करावा, असा आदेश तलाठी, सर्कल स्थानिक प्रशासनाला केला. याघटनेची पाहणी केल्यानंतर या स्फोटातील आगीमुळे पूर्णपणे नुकसान झालेल्या आदिवासी कुटुंबातील पोपट धादवड यांना भाकड यांनी वैयक्तिक दोन हजार रु पये अर्थसहाय्य या कुटुंबाला दिले. सदर घटनेची चौकशी करून सविस्तर माहिती जाणून घेतली.
सिलिंडरचा स्फोट; घटनास्थळाची तहसीलदारांकडून टाकेदला पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 10:56 PM