नांदूरशिंगोटे : जिल्हा परिषदेचे महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डी. बी. मुंढे यांनी येथील अंगणवाडीस गुरुवारी (दि. ४) सकाळी भेट देऊन तपासणी केली. विद्यार्थी पटसंख्येबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त करत कर्मचाºयांना फैलावर घेतले. आगामी काळात कामकाजात सुधारणा करा अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, अशा कडक शब्दांत खरडपट्टी केली.नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावर नांदूरशिंगोटे गाव असून, येथे जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या आठ अंगणवाड्या आहेत. गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डी. बी. मुंढे यांनी गावातील अंगणवाडी क्र मांक १, २ व ३ येथे भेटी देऊन तपासणी केली. यावेळी त्यांच्या समवेत महिला बालविकास प्रकल्प अधिकारी एल. डी. गवळी, अनुराधा राऊत, मुख्य सेविका सुरेखा शिंदे, विस्तार अधिकारी संजय मोरे, उपसरपंच उत्तम बर्के उपस्थित होते. अंगणवाडीतील विद्यार्थ्यांच्या पटसंख्येबद्दल मुंढे यांनी नाराजी व्यक्त करत कर्मचाºयांना जाब विचारला. वर्गात आठ ते नऊ विद्यार्थी हजर असल्याने ते अचंबित झाले. बालविकास प्रकल्प अधिकारी, मुख्य सेविका व अंगणवाडी सेविका यांना फैलावर घेत, आपण काय कामे करता, कामात कुचराई करणाºयांची गय केली जाणार नाही, महिनाभरात आपल्याला कामात प्रगती दिसली पाहिजे अन्यथा कारवाई केली जाईल, अशा कडक शब्दांत मुंढे यांनी सुनावले. मुंढे यांनी हजेरीपट, पोषक आहार, कुपोषित बालक, शासनस्तरावरून येणारे साहित्य याची माहिती घेतली. तसेच गावातील पदाधिकाºयांनी व पालकांनी अंगणवाडीच्या कामकाजात लक्ष देऊन सुधारणा करून घेण्याच्या दृष्टीने उपाययोजना कराव्यात, असेही त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य नीलेश केदार, सरपंच गोपाळ शेळके, उपसरपंच उत्तम बर्के, सदस्य निवृत्ती शेळके, अनिल पठारे, लिपिक विकास सूर्यवंशी, नागेश शेळके, कृष्णाबाई इलग, सविता शेळके आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
डी. बी. मुंढे : कामात सुधारणा करा अन्यथा कारवाई नांदूरशिंगोटेत अंगणवाड्यांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2018 12:00 AM
नांदूरशिंगोटे : जिल्हा परिषदेचे महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डी. बी. मुंढे यांनी येथील अंगणवाडीस गुरुवारी (दि. ४) सकाळी भेट देऊन तपासणी केली.
ठळक मुद्देकामकाजात सुधारणा करा अन्यथा कारवाईविद्यार्थ्यांच्या पटसंख्येबद्दल नाराजी