ओझर: येथील एचएएल मधील सुखोई विमान बांधणीमध्ये महत्वाचे काम करणारी डायनामॅटिक टेक्नॉलॉजीज लि. कंपनीतील कामगारांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. कंपनीतील कामगार गत दहा वर्षापासून काम करीत आहे.मात्र त्यांना कंपनीच्या पेरोलवर घेतलेले नाही. या कामगारांना पेरोलवर घ्यावे अशी प्रमुख मागणी संघटनेची आहे. नाशिक जिल्हा मजदूर संघ संलग्न भारतीय मजदूर संघटनेच्या माध्यमातून या कंपनीतील कामगाराचे मागणी पत्र जानेवारी २०१८ पासून प्रलंबित आहे. हे सर्व कामगार अंतरी स्वरूपाचे काम करतात. केंद्र सरकारचे सद्याचे किमान वेतन १८ हजार रु पये आहे. मात्र डी. टी.एल. कंपनीतील कामगाराना मिळणारे वेतन अनिहाय कमी आहे. बेंगलोर येथील डी.टी.एल. कंपनीतील कामगारांना ओझर येथील कामगारांचे काम समान असूनही आम्हाला त्यांच्या प्रमाणे वेतन दिले जात नाही. बेंगलोर येथील जे.के.एम. कंपनीतील कामगारांना डी.टी.एल. च्या पेरोलवर घेतले आहे मात्र ओझर येथील कामगारांना डी.टी.एल.च्या पेरोलवर घेतले जात नाही , वेतन वाढ दिली जात नाही. अन्य सेवा सुविधा मिळत नाही. गेले दहा महिने आम्ही वाट बघूनही व्यवस्थापनाकडून कुठलेही सहकार्य मिळत नाही म्हणून अकरा अक्टोबर पासून सर्व कामगारांनी बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतल्याचे निवेदनात म्हटले आहे. सदरचा संप यशस्वी करण्यासाठी नाशिक जिल्हा भारतीय मजदूर संघाचे जिल्हा सचिव विजय मोगल, अध्यक्ष गोविंद चिंचोरे, सुरेश चारभे, कंपनीतील युनियन पदाधिकारी राजेश पगारे,सुनील कमांनकर,राकेश गणोरे, सचिन मंडलिक, सचिन मळोदे व कंपनीतील सर्व कामगार उपस्थित होते.
डी. टी. एल. कामगारांचे बेमुदत कामबंद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 2:17 PM